एक्स्प्लोर

गाढव फार्म सुरू करून त्याने रचला इतिहास! सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडली, होतंय कौतुक

First Donkey Farm In Karnataka : दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील एका गावात एका 42 वर्षीय व्यक्तीने गाढव फार्म सुरू करून इतिहास रचला आहे.

First Donkey Farm In Karnataka : दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील एका गावात एका 42 वर्षीय व्यक्तीने गाढव फार्म सुरू करून इतिहास रचला आहे. ८ जून रोजी सुरू केलेले हे फार्म कर्नाटकातील पहिले आणि केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यानंतर देशातील दुसरे आहे. शेतमालक श्रीनिवास गौडा म्हणतात की गाढवांचे फार्म सुरू करताना अनेकदा नकार आला, तसेच त्यांना कमी लेखले गेले.

सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडली

बीए पदवीधर असलेल्या गौडा यांनी सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर 2020 मध्ये इरा गावात 2.3 एकर जागेवर प्रथम एकात्मिक कृषी आणि पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि चारा विकास केंद्र सुरू केले. शेळीपालनापासून सुरुवात केलेल्या या फार्ममध्ये आधीच ससे आणि कडकनाथ कोंबड्या आहेत. गौडा म्हणाले की, गाढवाच्या फार्ममध्ये 20 गाढवे असतील.

लोकांना पॅकेटमध्ये गाढवाचे दूध देण्याचा विचार

वॉशिंग मशिन, तसेच कपडे धुण्यासाठी वापरात आलेले इतर तंत्रज्ञान यामुळे गाढवांचा वापर कमी होत गेला. यामुळे गाढवांच्या प्रजातींची संख्या कमी होत असल्याचे कारण त्यांनी सांगितले, गौडा म्हणाले की, जेव्हा गाढवाच्या फार्मची कल्पना त्यांच्याशी शेअर केली गेली, तेव्हा अनेक लोक घाबरले आणि त्यांची खिल्ली उडवली. गाढवाचे दूध चवदार, खूप महाग आणि औषधी मूल्य आहे. गौडा लोकांना पॅकेटमध्ये गाढवाचे दूध देण्याचा विचार करत आहेत.

मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमधून करणार पुरवठा

ते म्हणाले की 30 मिली दुधाच्या पॅकेटची किंमत 150 रुपये आहे. मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमधून पुरवठा केला जाईल. सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे गाढवाचे दूध विकण्याचीही योजना आहे. ते म्हणतात की 17 लाख रुपयांच्या ऑर्डर आधीच मिळाल्या आहेत.

गाढविणीच्या दुधाने वाढते रोगप्रतिकारक क्षमता 
 
गाढविणीच्या दुधाचे सेवन केल्याने सायटो कायनिन नावाचा महत्त्वाचा घटक मानवी शरीरात वाढतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली होते. शिवाय या दुधात ड जीवनसत्व असते. ज्याचा फायदा अर्थरायटीस आजारांच्या रुग्णांना होतो सध्या कोरोना काळ सुरू असल्याने या दुधाची मागणी वाढलीय आणि त्याचा परिणाम हे दूध 10 हजार रूपये विक्री होतेय. अशी माहिती परभणीच्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील पशुजन्य पदार्थ प्रक्रिया विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ संदीप रिंढे यांनी दिलीय...
 
राज्यात 35 हजार गाढव
 
राज्यात 35 हजार गाढव असूने त्यातील 20 हजार गाढवे एकट्या मराठवाड्यात आहेत. नांदेडमध्ये जवळपास 7500 गाढव आहेत. प्रति दिवस एक गाढविण 250 ते 300 ग्राम दूध देते.

गाढविणीच्या दुधापासून साबण बनवण्याचा प्रयोग यशस्वी
आपल्याला गाय , म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे . गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग आणि  उमरगा शहरात सध्या दहा व्यवसायिक गाढविणीच्या दुधाची घरोघरी जावून विक्री करत आहेत. टाटा सामाजिक संस्थेच्या विद्यापीठात गाढविणीच्या दुधाचे साबण बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग आणि उमरगा परिसरात गाढविणीचे दुध शंभर रुपयाला 10 मिली या दराने विकले जाते आहे. या दराने गाढवाच्या दुधाचा दर एक लिटरमागे दहा हजार रुपये होतो. हे लोक गाढविणीला सोबत घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत.

आरोग्यासाठी उत्तम
एक गाढविण दररोज पाव लिटर दुध देते. शहरात फिरल्यानंतर कधी एका व्यावसायिकांचे 300 रुपयांचे तर कधी 400 रुपयांचे दूध विकले जात आहे. नळदुर्ग शहरात दररोज 15 गाढविणीचे 4500 रुपये ते 5 हजार रुपयांचे दूध विकले जाते. गाढविणीच्या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ, न्यूमोनिया असे आजार होत नाहीत असा समज आहे. लहान मुलांना सर्दी, पडले असे आजार होऊ नयेत म्हणून या दुधाचा वापर केला जायचा.नांदेड जिल्ह्यातील अशा प्रकारचा व्यवसाय करणारे व्यावसायिक सध्या 15 गाढविणींसह नळदुर्ग, उमरगा शहरात दाखल झाले आहेत.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये ही उपचार पद्धती रूढ आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी आहे. या दोन्ही राज्यात गाढविणीचे दूध ८ हजार रुपये लिटर या भावाने विकले जाते असा दावा केला जातोय.

इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget