खाद्य तेलाच्या किमतींवर युक्रेन रशियाचा युद्धाचा परिणाम; सोयाबीनचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना लाभ पण...
Washim Soybean Market News : सोयाबीनचे भाव वाढत असल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्य तेलावरही स्पष्ट दिसत आहे.
![खाद्य तेलाच्या किमतींवर युक्रेन रशियाचा युद्धाचा परिणाम; सोयाबीनचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना लाभ पण... effects of the Ukraine-Russia war on edible oil; Farmers benefit from rising soybean prices खाद्य तेलाच्या किमतींवर युक्रेन रशियाचा युद्धाचा परिणाम; सोयाबीनचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांना लाभ पण...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/28/5c7b2e6059b457d081a0d7dd08c3df65_12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Washim Soybean Market वाशिम : रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम बाजारपेठेवर होताना दिसत आहे. युद्धाचा परिणाम भारतीय बाजारपेठांमधील सर्वच गोष्टीवर पहायला मिळत आहे. दुसरीकडे सोयाबीनचे भाव वाढत असल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यापासून सहा हजार प्रती क्विंटल असणार सोयाबीन सात हजार पाचशे रूपयांवर पोहोचले. मात्र युद्धामुळं परिणाम बाजारात विकल्या जाणाऱ्या खाद्य तेलावरही स्पष्ट दिसत आहे.
वाशिमच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी सध्या मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे. गेल्या 4 महिन्यांपासून सहा हजार रुपयांच्या आत असलेल्या सोयाबीनचे दर रशिया युक्रेन युद्धामुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या भावात चांगलीच वाढ झाल्याचं दिसत आहे. सोयाबीन सध्या सात ते साडे सात हजार पार विक्री होत आहे. रशियामधून येणाऱ्या सुर्यफुल तेलाची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम भारतीय बाजार पेठेवर दिसत आहे.
अतिपावसाने सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली तर अनेक ठिकाणी हाती आलेलं सोयाबीन चांगल्या दर्जाचं आलेलं नाही. रशिया युक्रेन युद्ध याचा परिणाम थेट खाद्य तेलाच्या दरवाढीवर झाला आहे. तेलाच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत सोयाबीनच्या किमतीत वाढ होणे गरजेचं असल्याचं मत शेतकऱ्यांचं आहे.
वाशिममधील व्यापाऱ्यांच्या मते गेल्या 15 दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजार पेठेत सोयाबीनचे दर वाढत आहेत. भारताला कच्चे सोयाबीन तेल मुख्यत: अर्जेंटिना आणि ब्राझीलहून आयात केले जाते. त्याचप्रमाणे, कच्चे सूर्यफूल तेल युक्रेन, रशिया आणि अर्जेंटिना येथून आयात केले जाते. मात्र, सध्या रशिया आणि युक्रेनचा वाद पेटल्यामुळे तेल आयातीवर परिणाम होऊन सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. प्रत्येक खाद्य तेलांच्या किमतींमध्ये प्रति किलो 40 रुपयाची वाढ झाली आहे.
ब्राझील आणि अर्जेंटीना या मुख्य सोयाबीन उत्पादक देशात आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन उत्पादनात घट येऊन सोयाबीन दरात तेजी आली आहे. त्यात रशिया युक्रेनच्या युद्धाची भर पडली. रशिया, युक्रेन या काळ्या समुद्री देशातून भारतात मोठ्या प्रमाणात सुर्यफूल तेलाची आवक होती, ती ठप्प झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)