वादळी पावसाचा नंदुरबारला मोठा फटका, केळीच्या बागा जमिनदोस्त, अद्याप पंचनामे नाहीत
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा (Banana Crop) जमिनदोस्त झाल्या आहेत.
Agriculture News: राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही भागात वादळी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही भागात शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. दरम्यान, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी केळीच्या बागा (Banana Crop) जमिनदोस्त झाल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
प्रशासनाच्या वतीनं अद्याप पंचनाम नाहीत
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे. ब्राह्मणपुरी, सुलवाडा ,पिंपरी शिवारात केळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मधुकर पाटील या शेतकऱ्यांचे एकूण 8 हजारपेक्षा अधिक केळीची झाडे जमिनदोस्त झाली आहेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग आडवी झाली आहे. दरम्यान, अद्यापही प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे पंचनामे केले नाहीत. यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
6 जूनला मान्सूनचे राज्यात आगमन
सध्या मान्सून राज्यात दाखल झाला आहे. 6 जूनला मान्सूनचे राज्यात आगमन झाले असले तरी अद्याप संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय झाला नाही. हळूहळू मान्सन सक्रिय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मान्सून सुरुवातीला कोकणात दाखल झाला. त्यानंतर मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा शती पिकांना फटका बसत आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज राज्याच्या विविध भागात पाऊस पडणार आहे. राज्यात 14 जून पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. परंतू, या कालावधीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजेच राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार अशी शक्यता पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे. उर्वरित राज्यात मात्र खूप मोठा पाऊस पडणार नाही. तसेच 15 ते 16 जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहान हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या: