Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे पपई, केळी जमीनदोस्त; सरकारने सरसकट मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी
Crop Loss Due to Rain : शेतीचे नुकसान प्रचंड असून प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू झाले असले तरी, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानाच्या क्षेत्र वाढतच आहे, परिणामी पंचनामे होण्यास विलंब होत आहे.
![Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे पपई, केळी जमीनदोस्त; सरकारने सरसकट मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी Crop Loss Due to Unseasonal Rain in Nandurbar farmers Demands immediately help from government Crop Insuarance Panchamana maharashtra rain updates Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे पपई, केळी जमीनदोस्त; सरकारने सरसकट मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/03/6022dd8ffe8c8f9b997da526c7c35fe31701589032319322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nandurbar New : आठवडाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) होत असलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतीच्या नुकसानीचा आकडा (Crop Loss) वाढताच दिसत आहे. प्रशासनाकडून पंचनामे (Crop Insuarance) सुरू मात्र दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचं दिसून येतच आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांची सरसकट मदतीची मागणी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सलग अवकाळी पावसाने कहर केला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं आहे. शेतीचे नुकसान प्रचंड असून प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू झाले असले तरी, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानाच्या क्षेत्र वाढतच आहे, परिणामी पंचनामे होण्यास विलंब होत आहे. तर, दुसरीकडे सरकारने पंचनामे यांचा फास न ठेवता सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवकाळी पावसाचा धुमाकूळ, शेतीचं मोठं नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीसाठी आलेली पपई, केळी जमीनदोस्त झाली आहेत. तर, कापूस, मिरची, कापणी केलेला भात आणि गुरांसाठी असलेला चारा सारकही अवकाळीमुळे हातातून गेलं आहे. यामुळे सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्र वाढतच
प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्र वाढत असल्याने पंचनाम्यांना वेळ लागत असल्याचं प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान असलं तरी पंचनामे करून काय उपयोग, दुष्काळ जाहीर होऊनही विम्याची अग्रीम मिळत नाही तर, अवकाळीची नुकसानभरपाई कधी मिळेल, त्यामुळे सरकारने सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावरही दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, काही भागात हवामान कोरडं राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात हवामानात गारठा जाणवणार आहे. कोकण किनारपट्टी भागात हवामान कोरडं पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)