एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: राज्यात सरकार असताना शेतकर्‍यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागतायेत, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

राज्यात सरकार असताना शेतकर्‍यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागत असतील, तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Devendra Fadnavis on Crop insurance : महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यापलिकडे आणि जबाबदारी ढकलण्यापलिकडे काहीच करत नाही. राज्यात सरकार असताना शेतकर्‍यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागत असतील, तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे? असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा लगावला. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात फडणवीस बोलत होते. 

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत लोमटे आणि इतरांनी जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार 287 शेतकर्‍यांवर पीकविम्यासंदर्भात झालेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या सर्व शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे फडणवीस म्हणाले. विमा कंपन्यांनी 6 आठवड्यात या शेतकर्‍यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. विमा कंपन्यांनी ही भरपाई न दिल्यास 6 आठवड्याच्या आत राज्य सरकारने ही नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकर्‍यांना मदत करावी, असे सुस्पष्ट आदेश दिले असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यात सरकार असताना शेतकर्‍यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागत असतील, तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे? असे फढणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते, इतर सर्व याचिकाकर्ते अशा सर्वांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले.

शेतकऱ्यांना खरीप-2020 मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र विमा कंपन्या आपली मर्जी चालवत शेतकऱ्यांवर अन्याय करीत होत्या. राज्य सरकारकडे देखील वारंवार दाद मागितली पण काही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर माननीय उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची कैफियत ऐकून ऐतिहासिक निर्णय दिल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या संदर्भातील लढा अखेर यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील साडेतीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा खरीप 2020 चा पीक विमा मंजूर झाला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दरम्यान, आता जिल्ह्यात एकूण 510 कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget