(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara News : शेतकऱ्यांना सलग तिसऱ्यांदा दिलासा; धान, मका खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ
Bhandara News : शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेत शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादन केलेलं रब्बी हंगामातील धान आणि मका विकता यावा यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
Bhandara News: भंडारा : शासकीय आधारभूत धान (Paddy)खरेदी योजनेत शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादन केलेलं रब्बी हंगामातील धान आणि मका विकता यावा यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 31 मे पर्यंत मुदत होती. त्यानंतर 20 जूनपर्यंत ती वाढविण्यात आली होती. त्यात आता आणखी मुदतवाढ करून ती 30 जूनपर्यंत करण्यात आली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत अजूनही हजारो शेतकऱ्यांची (Farmers) ऑनलाइन नोंदणी झालेली नसल्यानं हजारो शेतकरी शासकीय केंद्रावर धान आणि मका विक्रीपासून वंचित राहणार होते. त्यामुळं पणन महामंडळानं 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळं आता ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही, अशांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन भंडारा जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केलं आहे.
30 जूनपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा
भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचं उत्पादन घेतात. अशातच रब्बी हंगामातील धानाची विक्री (Paddy), आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी नोंदणी करणे गरजेचे असतं. या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत 31 मे पर्यंत होती. मात्र, यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत अजुनही अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या वतीने दिलेली मुदत वाढण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmer) रब्बी हंगामाच्या धान विक्रीकरिता त्यांची नोंदणी नजिकच्या केंद्रावर करावी, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, कृषी विभागाचं आवाहन
दुसरीकडे राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. त्यामुळं पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, काही भागात अद्यापही पेरणी (Sowing) योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना (Farmers) अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अजूनही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी योग्य पावसाशिवाय पेरणीची घाई करु नये असं आवाहन कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे (Agriculture Superintendent Manoj Kumar Dhage) यांनी केलं आहे.
100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये
गेल्या चार-पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये खामगाव, शेगाव, देऊळगाव राजा, चिखली, जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 70 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. त्यामुळं या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. तर इतर तालुक्यांमध्ये कमी पाऊस पडल्याने शेतकरी आता पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे 100 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या