Farming success: अवघ्या 25 गुंठ्यात हळदीतून काढलं लाखोंचं उत्पन्न, बीडच्या शेतकऱ्याची कमाल, वर्षाकाठी मिळतात..
शिक्षण झालं की नाेकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देत सातत्य दाखवत या शेतकऱ्यानं हळदीचं उत्पादन घेतलं आहे.
शिक्षण असूनही नोकऱ्या न मिळण्याचं प्रमाण अधिक असल्यानं आता उच्चशिक्षित तरुणांना शेतीकडे वळण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुण शेतकरी कसोशीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. असेच बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलंय. अवघ्या २५ गुंठ्यात हळदीतून लाखोंचं उत्पन्न कमवत असून वर्षाकाठी या शेतकऱ्यानं हळदीसह फुलपिकांमधून चांगलं उत्पन्न मिळवत आहे.
गेल्या वर्षापासून हळद पिकाला चांगला भाव मिळतोय हे लक्षात घेऊन २५ गुंठ्यात बीडच्या विजय शिंदे या शेतकऱ्यानं हळदीचं पीक घेतलं. खरंतर बीड जिल्ह्यात सोयाबीन, हरभरा अशी पारंपरिक पिकेच घेतली जातात. पण याच भागात हळदीच्या लागवडीनं या शेतकऱ्याला फायदा झाला असून २५ गुंठ्यात हळदीची शेती यशस्वी करून दाखवली आहे.
गेल्या पाच वर्षापासून हळद लागवड
बीडमधील होळ गावचे विजय शिंदे या प्रगतशील शेतकऱ्याने चार ते पाच वर्षांपासून हळद लागवड करतात. यांच्या एकूण शेतीच्या क्षेत्राच्या केवळ २५ गुंठ्यात हळदीचे लागवड करतात व त्या पिकातून ते वर्षाकाठी ५ ते ६ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. या हळद लागवडीच्या माध्यमातून चांगला नफा मिळतो. या पिकामध्ये त्यांनी मुगाचं पीक आंतरपीक म्हणून लावले. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं दिसून येतात.
हळदीतून भरघोस कमाई
बीडच्या विजय शिंदे या शेतकऱ्यानं २५ गुंठ्यातून हळदीतून भरघोस कमाई करत आहेत. हळद शेतातून थेट बाजारपर्यंत विक्रीसाठी विशेष काळजी घेतात. वेळच्या वेळेला पाण्याचं व्यवस्थापन नीट केल्यानं हळद वाढलसाठी त्यांना चांगला फायदा झाला आहे. आहारात हळदीला मोठी मागणी असल्यानं हळद लागवडीला या शेतकऱ्यानं प्राधान्य दिल्याचं दिसत आहे. २५ गुंठ्यात ५ ते ६ लाख रुपये वर्षाकाठी ते कमवतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा केला वापर
शिक्षण झालं की नाेकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देत सातत्य दाखवत या शेतकऱ्यानं हळदीचं उत्पादन घेतलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेऊन कमीत कमी क्षेत्रात देखील लाखो रुपये कमावण्याची किमया देखील त्यांनी साध्य केलेली आहे. हळद पिकाच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते हे देखील त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
हेही वाचा: