एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प महत्वपूर्ण :  मुख्यमंत्री 

शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

CM Eknath Shinde : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचं, शेतकरी बांधवांचं मोठं योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. त्यामुळं या स्मार्ट प्रकल्पाला गती द्यावी, त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावं, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

निधीची कमतरता भासू देणार नाही

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबवण्यात यावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.

CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प महत्वपूर्ण :  मुख्यमंत्री 

हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात यावा : फडणवीस

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविल्यामुळं राज्यातील शेतकरी बांधवांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात यावा. या प्रकल्पाला शासन स्तरावरुन आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित मान्यवरांना प्रकल्पाची माहिती दिली.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपरमुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपरमुख्य सचिव राजेशकुमार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. तसेच दृकश्राव्य प्रणालीद्वारे जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होते.

पुणे महानगर पालिकेमार्फत जागा उपलब्ध करुन देणार

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात 'अर्बन फूड सिस्टिम' राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत ग्राहकांपर्यंत सेंद्रीय आणि विषमुक्त शेतमाल पोहोचविण्यासाठी पुणे महानगर पालिकेमार्फत जागा आणि ओटे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Badlapur Case Accused Akshay Shinde : एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
Amol Kolhe on Akshay Shinde Encounter :'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
Kolhapur Crime : चांदीने केली नात्याची माती, भावानं केली भावाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा
चांदीने केली नात्याची माती, भावानं केली भावाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा
Badlapur Encounter: बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय
बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Mahajan Majha Katta : एकनाथ खडसेंचं चॅलेंज स्वीकारुन गिरीश महाजन 'माझा' कट्ट्यावर #abpमाझाAkshay Shinde News :  बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:गोळा झाडून घेतलीABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 23 September 2024Jalna Maratha Protest : धुळे-सोलापूर महामार्गावर मराठा बांधवांच्या रास्तारोकोमुळे वाहतूक कोंडी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur Case Accused Akshay Shinde : एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
Amol Kolhe on Akshay Shinde Encounter :'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
Kolhapur Crime : चांदीने केली नात्याची माती, भावानं केली भावाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा
चांदीने केली नात्याची माती, भावानं केली भावाची निर्घृण हत्या; कोल्हापुरातील चांदी व्यावसायिकाच्या हत्येचा अवघ्या काही तासात उलघडा
Badlapur Encounter: बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय
बदलापूर आरोपीचा एन्काऊंटर, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं पुढं काय
ओबीसीत समावेश केलेल्या कुणबीच्या तीन पोटजाती कोणत्या?; मंत्रिमंडळ निर्णयातून समोर
ओबीसीत समावेश केलेल्या कुणबीच्या तीन पोटजाती कोणत्या?; मंत्रिमंडळ निर्णयातून समोर
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण
Ajinkya Rahane : सरकारची घोषणा अन् अजिंक्य रहाणे झाला कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सरकारची घोषणा अन् अजिंक्य रहाणे झाला कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Tirupati Laddu Controversy : जनावरांच्या चरबीयुक्त लाडूच्या वादानंतर तिरुपती मंदिरात देवस्थान समितीचा सर्वात मोठा निर्णय!
जनावरांच्या चरबीयुक्त लाडूच्या वादानंतर तिरुपती मंदिरात देवस्थान समितीचा सर्वात मोठा निर्णय!
Embed widget