Agriculture Growth : गोरखपूरमध्ये कृषी संशोधन केंद्र उभारणार, गव्हासह मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा, विद्यार्थ्यांना करता येणार संशोधन
उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) गोरखपूरमध्ये (Gorakhpur) कृषी संशोधन केंद्र स्थापन (Agriculture Research Centre) केले जात आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
![Agriculture Growth : गोरखपूरमध्ये कृषी संशोधन केंद्र उभारणार, गव्हासह मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा, विद्यार्थ्यांना करता येणार संशोधन Agriculture research center being established in Gorakhpur uttar pradesh Agriculture Growth : गोरखपूरमध्ये कृषी संशोधन केंद्र उभारणार, गव्हासह मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा, विद्यार्थ्यांना करता येणार संशोधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/25/7a01515948a38bd9f278514db732b8681669358348043339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Agriculture Research Centre : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) गोरखपूरमध्ये (Gorakhpur) कृषी संशोधन केंद्र स्थापन (Agriculture Research Centre) केले जात आहे. या संशोधन केंद्राचा गहू (Wheat) आणि मका (Maize) उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळं गहू आणि मक्याच्या नवीन जाती विकसीत करण्यास देखील मदत होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नवीन विषयांवर संशोधनही करता येणार आहे.
सध्या देशातील शास्त्रज्ञ गहू, मका, बाजरी आणि इतर पिकांच्या प्रगत जाती विकसित करण्याचे काम करत आहेत. कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ हे काम करत आहेत. सध्याच्या वातावरणानुसार पिकाच्या नवीन प्रजाती विकसित करण्याचा उद्देश असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम सर्व फळे आणि भाज्यांवर झाला आहे. हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. त्यामुळं बदलत्या हवामानाला तग धरू शकतील अशा पिकांच्या नवीन प्रजाती तयार केल्या जात असल्याची माहितीही शास्त्रज्ञांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना फायदा होणार
दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ, गोरखपूर, उत्तर प्रदेशच्या कृषी आणि नैसर्गिक विज्ञान संस्थेत आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र (GCIAR) चे संघटन स्थापन केले जाणार आहे. पूर्वांचलमध्ये असे कोणतेही केंद्र अद्याप अस्तित्वात नाही. या केंद्राचा विकास करून पूर्वांचलच्या मोठ्या लोकसंख्येला त्याचा लाभ मिळणार आहे. या संशोधन केंद्राच्या स्थापनेबाबत देशातच नव्हे, तर विदेशातही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत संशोधन केंद्र उभारण्यावर एकमत झाले आहे.
गहू, मका, धानाच्या सुधारित जाती विकसित केल्या जाणार
गहू, मका, धान व इतर पिकांच्या प्रगत जाती विकसित करण्यासाठी हे कृषी केंद्र उभारले जात आहे. या केंद्राच्या स्थापनेमुळे पूर्वांचलमध्ये गहू, मका आणि धानाच्या बियांच्या विविध जाती विकसित केल्या जातील, अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठात शिकणारे होतकरु विद्यार्थी शेतीशी संबंधित विविध विषयांवर संशोधन करू शकतील.
गव्हाच्या दोन नवीन वाणांपासूनही बंपर उत्पादन मिळते
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम, इंदूर, जबलपूर आणि सागर संशोधन केंद्रात तीन वर्षे संशोधन करण्यात आले. संशोधनानंतर गव्हाच्या 1634 आणि 1636 या दोन नवीन जाती विकसित केल्या आहेत. 1634 या जातीच्या गव्हाचा पीक कालावधी 110 दिवस आणि 1636 चा कालावधी 115 दिवस आहे. दोन्ही विकसित बियाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे तापमान जास्त असतानाही ते वेळेपूर्वी पिकत नाहीत. गव्हाचे उत्पादनही कमी होणार नाही. उच्च तापमानामुळे गव्हाच्या जुन्या वाणांचे उत्पादन 20 टक्क्यांपर्यंत घटल्याचे संशोधनातून समोर आले आहे. गव्हाच्या या दोन नवीन जाती मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पेरणीसाठी योग्य मानल्या गेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Wheat Farming : यंदा गव्हाची विक्रमी लागवड, मागील वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी क्षेत्र वाढलं, कृषी मंत्रालयाची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)