एक्स्प्लोर

Agriculture News: भंडारा जिल्ह्यात टोमॅटोची 'लाली' उतरली, शेतकऱ्यांचा अन्य पिकांकडे कल; नेमकी काय आहेत कारणं?

सध्या भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना (Farmers) करावा लागत आहे. त्यामुळं शेतकरी अन्य पिकांचा मार्ग स्विकारत आहेत.

Agriculture News: सध्या भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना (Farmers) करावा लागत आहे. त्यामुळं शेतकरी अन्य पिकांचे उत्पादन घेत असल्याचं चित्र दिसत आहे. वातावरण बदल आणि योग्य दर मिळत नसल्यानं टोमॅटोच्या उत्पादनावर (Tomato production) परिणाम झाला आहे. यामुळं शेतकरी चिंतेत असून टोमॅटोचं उत्पादन न घेण्याचा निर्णय घेत आहेत.  

शेतकरी आर्थिक विवंचनेत

भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील जांब परिसरात एकेकाळी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं होतं. मात्र, मागील काही वर्षात वातावरणातील बदल आणि टोमॅटोला बाजार मिळत नसल्यानं योग्य दराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी ज्या शेतीती टोमॅटोचं भरघोस उत्पादन घेतलं जातं असे ते शेतकरी आता आर्थिक विवंचनेत अडकलेत. त्यामुळं हे शेतकरी आता टोमॅटोऐवजी अन्य पिकांची शेती करण्याकडे वळल्याचं चित्र बघायला मिळत आहे.

शेतकऱ्यांचा कल भाजीपाला पिकांकडं

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन करणारे शेतकरी आहेत. भात पिकाला पर्याय म्हणून अनेकांनी नगदी पीक म्हणून पालेभाजी पिकाला महत्त्व दिलं. यात मोहाडी तालुक्यातील जांब, लोहारा, बीकेखेरी, देऊळगाव आणि आसपासच्या सुमारे 25 पेक्षा अधिक गावात भात पिकासह टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. सुमारे 400 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील शेतात टोमॅटोचं उत्पादन घेतलं जात होतं. मात्र, मागील काही वर्षांपासून वातावरण मोठ्या प्रमाणात बदल घडत असून वेगवेगळ्या प्रकाराच्या रोगांचाही प्रादुर्भाव यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. तर, दुसरीकडं उत्पादन निघाल्यावर बाजारात ते विक्रीसाठी नेल्यावर त्याला योग्य दर मिळत नाही. यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी, यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी आता अन्य पिकांकडं वळला आहे.

जांब आणि आसपासच्या गावात 400 हेक्टरवर उत्पादन होणारं टोमॅटो आता केवळ 100 हेक्टरवर घेतलं जात आहे. काही वर्षांपूर्वी टोमॅटोनं लाल दिसणारी शेती अनेकांचं आकर्षण ठरली होती. मात्र, आता निसर्ग आणि मानवांच्या दृष्टचक्रात टोमॅटो उत्पादक शेतकरी अडकला असून, सरकारनं मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. सराकारच्या धोरणाचा देखील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : जगाच्या बाजारात भारतीय शेतमालाला मोठी मागणी, पण मोदी सरकारच्या 'या' निर्णयांचा बसतोय फटका; शेतकरी मांडतायेत व्यथा

 

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
Embed widget