एक्स्प्लोर

Agriculture news : शेतकऱ्यांचे 400 रुपये द्या, अन्यथा कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही; स्वाभिमानीचा उद्या कोल्हापुरात एल्गार 

मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP पेक्षा 400 रुपये अधिक द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे.

Agriculture News : मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP पेक्षा 400 रुपये अधिक द्यावे. ते पैसे दसऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलीय. या प्रमुख मागणीसह विविध मांगण्यांसाठी उद्या (13 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावरील मोर्चा  काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे 400 रुपये घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पैसे दिले नाहीतर आम्ही यावर्षी कारखान्याचं एकही धुराडं पेटवू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला.  

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, माळेगाव सहकारी साखर कारखाना असेल यांची रिकव्हरी अकरा आणि साडेअकरा टक्के आहे. या कारखान्यांना जर 3300 आणि 3400 रुपयांचा दर देता येत असेल तर मग 13 टक्के रिकव्हरी असलेल्या कारखान्यांना दर देणं का शक्य नाही असा जाब आपण विचारला पाहिजे असे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं आपली ताकद दाखवली पाहिजे. त्याशिवाय कारखानदार पैसे देणार नाहीत आणि सरकार त्यांना पैसे देऊ देणार नाही असं राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं ज्याच्या घरी ऊस आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.  

कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करायला तयार, आपण संघटीत होणं गरजेचं

आपण लढलो तर आपल्या ऊसाच्या कांडीला सोन्याचा भाव येणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखर उद्योगामध्ये पुढील दोन वर्ष चांगलीच तेजी असणार आहे. त्यामुळं साखर कारखानदार नेहमीप्रमाणं आपली पिळवणूक करायला संघटीत झाले आहे. त्यामुळंआपण संघटीत होऊन लढलं पाहिजे असे राजू शेट्टी म्हणाले. मागचा साखरेचा गळीत हंगाम सुरू झाला त्यावेळी 3100 रुपये भाव होता. आता साखरेचे दर 3800 ते 3900 रुपये पर्यंत पोहोचले आहेत. सरासरी साखरेचा दर 3600 रुपये धरला तरी साखर कारखान्यांना टनाला 600 ते 700 रुपये जादा मिळणार आहेत. यातील शेतकऱ्यांना किमान 400 रुपये द्यावेत, अशी आमची मागणी असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 

ऊसाच्या उत्पादनात घट येणार 

यावर्षी राज्यात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जात आहेत. कमी पावसामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. खताच्या वाढत्या किंमती, पाणी टंचाई यामुळे यावर्षी उसाचे उत्पादन  घटणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं चांगले कारखाने जास्तीत जास्त 90 ते 100 दिवस चालू शकतील. अन्य कारखान्यांचा एक- दीड महिन्यातच गळीत हंगाम संपण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावरही होणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Raju Shetti : दुसऱ्या हप्त्याचे 400 रूपये तत्काळ द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी 

 

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget