Onion Price : भारतात कांद्याचे दर वाढले की आरडाओरड, मात्र अमेरिकेत कांद्याला दर किती? एकूण व्हाल थक्क
देशात कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होत आहे. प्रतिकिलो कांद्याचे दर हे 50 ते 60 रुपयांच्या आसपास आहेत. पण तुम्हाला अमेरिकेत कांद्याला किती दर मिळतो हे माहिती आहे का? पाहुयात त्याबद्दल माहिती.
Onion Price : शेतकऱ्यांना (Farmers) कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरं जावं लागतं. या संकटांवर मात करुनही काही शेतकरी चांगलं उत्पादन घेतात. सध्या देशात कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होत आहे. प्रतिकिलो कांद्याचे दर हे 50 ते 60 रुपयांच्या आसपास आहेत. कांद्याच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे मात्र आरडाओरड सुरु होते. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे गेले की सगळ्यांचे बजेट कोसळते. पण तुम्ही जर अमेरिकेतील कांद्याचे दर पाहिले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ होत आहे. कधी टोमॅटो तर कधी कांदा या भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत. या भाव वाढीनंतर सरकार काही धोरणं आखते, त्या धोरणामुळं कांदा असेल, टोमॅटो असले यांच्या दरात घसरण होते. दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या भागात कांद्याचा भाव 60 रुपये प्रतिकिलो आहेत. पण सध्या अमेरिकेत कांदा कोणत्या दराने विकला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? अमेरिकेत कांद्याचे दर हे भारतापेक्षा कितीतरी पेटीनं जास्त आहेत. सध्या अमेरिकेत कांद्याचा भाव हा प्रतिकिलोसाठी 240 ते 250 रुपयांपर्यंत आहे.
आकडेवारी काय सांगते?
एका अहवालानुसार, युरोपमध्ये कांद्याचा बराच काळ तुटवडा आहे. त्यामुळं अमेरिकेत कांद्याची मागणी वाढली आहे. अमेरिकेत पीक टंचाई आहे, त्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये अमेरिकेने 392389 मेट्रिक टन कांद्याची विक्री केली होती. त्याचवेळी, 2019 मध्ये अमेरिकेने 428,449 टन कांदा विकला. एकट्या 2019 मध्ये, अमेरिकन कांद्यामध्ये (भाजीपाला श्रेणी) स्वारस्य वाढले आहे. 2018 च्या तुलनेत 10.772 टक्क्यांनी बदल नोंदवला आहे. 2017 ते 2019 या कालावधीत कांद्याच्या निर्यातीत 19.25 टक्के वाढ झाली आहे.
अमेरिकेतील प्रमुख शहरांतील कांद्याचे दर किती?
न्यूयॉर्क - प्रतिकिलो 240 रुपये
लॉस एंजेलिस - प्रतिकिलो 250 रुपये
शिकागो - प्रतिकिलो 230 रुपये
ह्यूस्टन - प्रतिकिलो 220 रुपये
फिलाडेल्फिया - प्रतिकिलो 245 रुपये
सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढल्यानं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळं कांद्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कांद्याचे दर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
महत्त्वाच्या बातम्या: