एक्स्प्लोर

Onion : कांद्याचे दर घसरणार? शेतकऱ्यांना फटका बसणार, सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय 

कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं काम सुरु केलं आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 

Onion News : सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढल्यानं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. देश पातळीवर सरासरी कांद्याच्या दरात 57 टक्क्यांची वाढ झाल्याचा अहवाल एक दिवसापूर्वी आला होता. वर्षभरापूर्वी या काळात कांद्याचे दर 30 रुपये होता. तोच भाव आता 47 रुपये किलोवर गेला आहे. दरम्यान, या कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं काम सुरु केलं आहे. कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 

सरकार ही पावले उचलणार 

देश पातळीवर कांद्याच्या दरात सरासरी 57 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कांदा 47 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळं कांद्याच्या किंमती करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. यातून ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 30 रुपये प्रति किलो होती. त्यामध्ये सध्या वाढ झाली आहे. दरम्यान, सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं कांद्याच्या दरात घसरण होणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

सरकार बफर स्टॉकमधून कांदा देणार

ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही ऑगस्टच्या मध्यापासून बफर स्टॉकमधून कांदे उपलब्ध करून देत आहोत. किंमती वाढू नयेत आणि ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही किरकोळ विक्री वाढवत आहोत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या राज्यांमध्ये किंमती झपाट्याने वाढत आहेत, तेथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याचा पुरवठा केला जात आहे. ऑगस्टच्या मध्यापासून 22 राज्यांतील विविध ठिकाणी सुमारे 1.7 लाख टन कांद्याचा बफर स्टॉकमधून पुरवठा करण्यात आला.

किरकोळ बाजारात, नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) या दोन सहकारी संस्थांच्या माध्यमातून बफर स्टॉकमधील कांदे 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विकले जात आहेत. दिल्लीतही बफर स्टॉकमधील कांदा त्याच सवलतीच्या दराने विकला जात आहे.

कांद्याचे भाव का वाढले?

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामानाशी संबंधित कारणांमुळे खरीप कांद्याच्या पेरणीला उशीर झाल्यामुळं पीक कमी झाले. हे पीक बाजारात यायला उशीर झाला. सध्या खरीप कांद्याची आवक सुरु व्हायला हवी होती, मात्र तसे झाले नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. साठवलेला रब्बी कांदा संपल्याने आणि खरीप कांद्याची आवक होण्यास उशीर झाल्यामुळं पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळं घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वाढत आहेत.

सरकारनं केला दुप्पट बफर स्टॉक

सरकारनं चालू वर्ष 2023-24 मध्ये कांद्याचा बफर स्टॉक दुप्पट केला आहे. यामुळे देशांतर्गत उपलब्धता सुधारेल आणि आगामी काळात वाढत्या किमतींना आळा बसेल. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने NCCF आणि NAFED मार्फत पाच लाख टनांचा बफर स्टॉक ठेवला आहे. येत्या काही दिवसांत अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची योजना आहे. दरम्यान, या कांद्याच्या भाववाढीचा फटका सरकारला बसू नये सर्वसामान्य नागरिक आक्रमक होऊ नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Onion : कांद्याला दराची 'झळाळी', शेतकरी दु:खी कारण; दर आहे पण कांदा नाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget