एक्स्प्लोर

Cotton News : देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात घसरण, कापसाबरोबर 'या' शेतमालाची ऑस्ट्रेलियातून आयात होणार 

Cotton News : देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात (Cotton Price) घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत.

Cotton News : सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात (Cotton Price) घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. दरात घसरण होत असताना देशात कापसासह इतर सहा शेतमालाची आयात केली जाणार आहे. ही शेतमालाची करण्यात येणारी आयात ही आयात शुल्क (import duty) मुक्त असणार आहे. दरम्यान कोणत्या शेतमाल आयात केली जाणार आहे? कापसाच्या दरात घसरण का झाली? याबाबतची माहिती पाहुयात...

कापसाबरोबर या शेतमालाची आयात केली जाणार 

या महिनाभरात कापसाच्या दरात  प्रतिक्विंटलमागे 500 ते 800 रुपयांची घसरण झाली आहे. दर घसरल्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी कापूस साठवूण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे कापसाची आवक मंदावल्यामुळं सूत आणि कापड उद्योजकही चिंतेत आहेत. अशातच केंद्र सरकारनं ऑस्ट्रेलियातून कापसाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार करण्यात आला आहे. याअंतर्गत तापूस, मसूर, बदाम, संत्रा, पियर्स या शेतमालाची आयात केली जाणार आहे. ही आयात आयात शुल्क मुक्त असणार आहे. या आयातीत पूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. सध्या भारतीय सुताची मागणी घटली आहे. रुईची घटती मागणी तसेच सेबीने वायद बाजारावंर अघोषीत घातलेली बंदी यामुळं दरात घसरण होत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.

भारतातून कापसाची निर्यात होणं गरजेचं

देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात घसरण होत असताना ऑस्ट्रेलियातून कापसाची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आयातीत कापसावर 11 टक्के आयात शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळं पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण होण्याची भीती अभ्यासकांनी वर्तवली आहे. यावर्षी भारतानं ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन म्हणजेत तीन लाख गाठी कापसाची आयात होणार आहे.  केंद्र सरकारनं 2021 मध्ये कापसाच्या आयातीवर 11 टक्के आयात शुल्क लावले होते. मात्र, आता होणारी आयात ही आयात शुल्क मुक्त असणार आहे. त्यामुळं दरात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारतातून कापसाची निर्यात होणं गरजेचं असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातही कापसाच्या दरात घसरण

विदर्भासह (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन (cotton Production) घेतले जाते. मात्र, सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला विक्रमी दर पाहता यावर्षीही कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात कापसाचे दर पंधराशे ते दोन हजार रुपयांनी घटले आहेत. सध्या कापसाचा 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Cotton Import News : ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापसाची आयात होणार, आयात शुल्कही माफ; शेतकरी संघटनांची नाराजी  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदमABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटरनिटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Embed widget