(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cotton Import News : ऑस्ट्रेलियातून 51 हजार टन कापसाची आयात होणार, आयात शुल्कही माफ; शेतकरी संघटनांची नाराजी
Cotton Import News : केंद्र सरकारनं ऑस्ट्रेलियाकडून (Australia) तीन लाख गाठी म्हणजेच 51 हजार टन कापूस आयात (Cotton Import) करण्याचा निर्णय घेतला आहे.
Cotton Import News : सध्या राज्यातील कापूस उत्पादक ( Cotton Farmers) शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कापसाच्या दरात मोठी घसरण (Cotton Rate Decline) झाली आहे. अशातच आता केंद्र सरकारनं ऑस्ट्रेलियाकडून (Australia) तीन लाख गाठी म्हणजेच 51 हजार टन कापूस आयात (Cotton Import) करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन लाख गाठी कापसाची विनाशुल्क आयात करण्यात येमार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत विविध शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतातून निर्यात ठप्प असताना आयात करणं अयोग्य
कापूस आयातीवर लागू करण्यात आलेलं 11 टक्के शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातले परिपत्रक केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात अंतर्गत येणाऱ्या विदेश व्यापार संचालनालयानं प्रसिद्ध केलं आहे. 2022 च्या आयातीचा विचार केला तर यावर्षी आयातीत मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतातून कापूस किंवा रुई, सुताची निर्यात ठप्प आहे. अशातच परदेशातून भारतात कापूस आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय योग्य नसल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. देशातील जिनींग प्रेसिंग कारखानदार, व्यापारी, निर्यातदार आदींची संघटना असलेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने या सर्वांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. यावेळी कापूस आयातीसाठी कापसावरील 11 टक्के आयात शुल्क दूर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. अखेर ही मागणी मान्य करत आयात शुल्क माफ करण्यात आलं आहे.
सध्या राज्यात कापसाच्या दरात मोठी घसरण
शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. विदर्भासह (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन (cotton Production) घेतले जाते. मात्र, सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला विक्रमी दर पाहता यावर्षीही कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात कापसाचे दर पंधराशे ते दोन हजार रुपयांनी घटले आहेत. सध्या कापसाचा 7 हजार 500 ते 7 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: