(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 WC 2022 : सामन्याला काही वेळ असतानाच अॅडम झाम्पाला कोरोनाची बाधा, श्रीलंकेविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात मैदानात उतरणार?
Adam Zampa Corona Positive : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू अॅडम झाम्पा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
Adam Zampa Corona Positive : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेमध्ये आज ऑस्ट्रेलियाचा सामना श्रीलंकेशी होत आहे. हा सामना सायंकाळी 4.30 वाजता सुरू होईल. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू अॅडम झाम्पा कोविड-19 पॉझिटिव्ह (Adam Zampa Corona Positive) आढळला आहे. त्याच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. अशा स्थितीत झाम्पाला या सामन्यात खेळायला मिळेल अशी शक्यता अत्यंत कमी दिसत आहे.
दरम्यान विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच आयसीसीने (ICC New Regulations) नवीन नियमावली आणत स्पर्धेमध्ये, कोविड -19 संक्रमित खेळाडूंना (Corona Positive Players) देखील वैद्यकीय टीमच्या परवानगीनंतर खेळता येईल अशी घोषणा केली होती. रविवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात कोविड पॉझिटिव्ह असूनही आयर्लंडचा जॉर्ज डॉकरेल प्लेइंग-11 मध्ये सामील होता. त्यामुळे आज झाम्पाही ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-11 मध्ये सहभागी होऊ शकतो. पण त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? तसंच वैद्यकीय टीम काय सूचना देईल? यावर झाम्पाचं आजच्या सामन्यात खेळणं अवंलंबून असणार आहे.
🚨 Adam Zampa has tested positive for Covid-19 with minor symptoms ahead of today's #AUSvSL match in Perth
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 25, 2022
According to ICC's playing conditions, players who test positive can still take part in the #T20WorldCup 🏏 pic.twitter.com/QVZx9FKr8h
अॅडम झाम्पा हा ऑस्ट्रेलियन संघाचा (Team Australia) मुख्य गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 5.34 इतका आहे. अशा परिस्थितीत जर तो आज श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळू शकला नाही तर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसणार आहे.
ऑस्ट्रेलियासाठी सामना अत्यंत महत्त्वाचा
टी20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामुळे संघाचा नेट रन रेट खूपच खराब झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आता सामने गमावले तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत खूप मागे पडू शकतात. यामुळेच आजचा सामना ऑस्ट्रेलियन संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.
हे देखील वाचा-
T20 World Cup 2022 : 'तुझ्यामुळे मी वाचलो', दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला?