कसोटीत 500 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण? फक्त सात जणांनाचं गाठता आलाय विक्रमी टप्पा
Test Records: कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त सात गोलंदाजांनी आपल्या कारकिर्दीत 500 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
Test Records: कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त सात गोलंदाजांनी आपल्या कारकिर्दीत 500 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत श्रीलंकेच्या माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानी आहे. त्यांतर शेन वार्नचा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि चौथ्या क्रमांकावर भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे आहे. त्यानंतर या यादीत ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), स्टुअर्ट ब्रॉडचा (इंग्लंड) आणि कोर्टनी वॉल्स (वेस्ट इंडीज) यांच्या नावाचा सामावेश आहे.
1) मुथय्या मुरलीधरन
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीत 800 विकेट्स घेतल्या आहेत. मुरलीधरनची गोलंदाजीची सरासरी 22.72 आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक 22 धावा खर्च केल्यानंतर त्याला एका विकेट मिळाली आहे.
2) शेन वार्न
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शेन वार्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. वार्ननं त्याच्या कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 25.41 इतकी आहे. याच वर्षी शेन वार्नचं हृदयविकारच्या झटक्यानं निधन झालंय. शेन वार्नचं अचानक सोडून जाणं क्रिडाविश्वासाठी मोठा धक्का होता.
3) जेम्स अँडरसन
या यादीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अँडरसननं आतापर्यंत 646 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 26.52 इतकी आहे.
4) अनिल कुंबळे
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे यांचा चौथा क्रमांक लागतो. कुंबळेनं आपल्या कसोटी कारकिर्दीत 29.65 च्या गोलंदाजीच्या सरासरीनं 619 विकेट्स घेतल्या आहेत.
5) ग्लेन मॅकग्रा
ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा या यादीत टॉप-5 मध्ये आहे. मॅकग्राच्या नावावर 563 विकेट आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी 21.64 इतकी आहे.
6) स्टुअर्ट ब्रॉड
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत 541 विकेट्स आहेत.
7) कॉर्टनी वॉल्स
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्स हा 500 कसोटी विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज होता. त्याच्या नावावर 24.44 च्या गोलंदाजीच्या सरासरीनं 519 विकेट्स आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs SA: भारतीय संघात परतण्यासाठी केएल राहुलची धडपड, जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ समोर
- Watch Video: बाबर आझममुळं रन आऊट झाल्यानंतर इमाम-उल-हकचा संयम तुटला, भरमैदानातचं त्यानं...
- Indonesia Masters 2022: इंडोनेशिया ओपनमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत