Shikhar Dhawan: टी-20 क्रिकेटमध्ये शिखर धवननं रचला इतिहास; विराट, रोहितलाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं
Shikhar Dhawan: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्डेडियमवर पंजाब आणि गुजरात यांच्यात सुरु असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात शिखर धवननं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे
![Shikhar Dhawan: टी-20 क्रिकेटमध्ये शिखर धवननं रचला इतिहास; विराट, रोहितलाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं PBKS vs GT: Shikhar Dhawan scripts history, becomes 1st Indian to hit 1000 boundaries in T20s Shikhar Dhawan: टी-20 क्रिकेटमध्ये शिखर धवननं रचला इतिहास; विराट, रोहितलाही जमलं नाही ते त्यानं करून दाखवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2017/09/05114537/045.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shikhar Dhawan: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्डेडियमवर (Brabourne Stadium) पंजाब आणि गुजरात (PBKS vs GT) यांच्यात सुरु असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळाव्या सामन्यात शिखर धवननं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. गुजरातविरुद्ध सामन्यात तीन चौकार मारून त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारण्याचा पराक्रम केला. विराट कोहली, रोहित शर्माला आतापर्यंत 1000 चौकारांचा टप्पा गाठता आला नाही.
गुजरातविरुद्ध शिखर धवन त्याचा 307वा टी-20 सामना खेळत आहे. दरम्यान, नाणेफेक गमवल्यानंतर पंजाबच्या संघाकडून कर्णधार मयांक अग्रवालची साथ देण्यासाठी शिखर धवन मैदानात आला. परंतु, पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी पहिल्या पाच षटकात मयांक अग्रवाल आणि जॉनी बेयरेस्टोच्या रुपात दोन विकेट्स गमावली. मात्र, शिखर धवननं एकाबाजूनं संघाची बाजू संभाळली. या सामन्यात तीन चौकार मारून त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये 1000 चौकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. अशी कामगिरी करणारा शिखर धवन पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. या यादीत विराट कोहली (917 चौकार) दुसऱ्या आणि रोहित शर्मा (875 चौकार) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना 779 चौकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
शिखर धवननं आतापर्यंत 307 टी-20 क्रिकेट सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 8 हजार 850 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यानं 2007 मध्ये दिल्लीकडून पहिला मर्यादीत षटकांचा सामना खेळाला होता. त्यानंतर 2011 मध्ये त्यानं भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
हे देखील वाचा-
- PBKS vs GT: हार्दिकनं टॉस जिंकला, गुजरातचा संघ प्रथम गोलंदाजी करणार
- IPL 2022: युजवेंद्र चहलनं सांगितला आयपीएलमधील भयानक किस्सा; दारूच्या नशेत एका क्रिकेटरनं त्याच्यासोबत...
- IPL 2022 : चेन्नई-मुंबईची पाटी कोरीच, कोलकाता पहिल्या स्थानावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)