Shreyas Iyer : प्रशिक्षक आणि कर्णधारच नाही तर संघाचे CEO देखील टीम सिलेक्शनमध्ये घेतात भाग, श्रेयसच्या विधानाने खळबळ
मुंबई इंडियन्स विरुद्धत्या विजयानंतर बोलताना श्रेयस अय्यरने एक मोठं विधान दिलं आहे. सामन्यापूर्वी संघनिवड करताना संघाचे सीईओ देखील यात सहभाग घेत असल्याचं मोठं विधान श्रेयस अय्यरने केलं आहे.
Shreyas Iyer On KKR : आयपीएल (IPL 2022) स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील 56 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबई इंडियन्सला (MI) 52 धावांनी मात दिली. या सामन्यातील विजयात केकेआरचा स्टार खेळाडू पॅट कमिन्सने एकप्रकारे पुनरागमन केलं. केकेआर या सामन्यासाठी 1-2 नाही तर तब्बल 5 बदलांसह मैदानात उतरला होता. दरम्यान या विजयानंतर बोलताना श्रेयस अय्यरने एक मोठं विधान दिलं आहे. सामन्यापूर्वी संघनिवड करताना संघाचे सीईओ देखील यात सहभाग घेत असल्याचं मोठं विधान श्रेयस अय्यरने केलं आहे.
दरम्यान श्रेयसच्या या विधानानंतर मोठी खळबळ उडाली आहे. क्रिकेटची अधिक जाण असणाऱ्या प्रशिक्षक तसंच संघचा कर्णधार यांच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीलाही संघ निवडीचे अधिक असल्याने अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरच्या मते काही मोठे निर्णय यंदा संघाने घेतले आहेत. पॅट कमिन्ससारख्या खेळाडूला अंतिम 11 मध्ये न घेणं हा एक अत्यंत मोठा निर्णय होता. संघाचे अंतिम 11 निवडताना टीमचे सीईओ देखील मदत करत असतात असं श्रेयस म्हणाला. दरम्यान केकेआरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाचे सीईओ अशी कोणतीही भूमिका बजावत नाहीत. त्यांचं मत विचारल्यास ते सल्ला देतात पण अंतिम निर्णय़ कर्णधार आणि कोच यांचाच असल्याचं या सूत्रांनी सांगितलं आहे.
मुंबईचा मोठा पराभव
जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन यांच्या दमदार खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावे लागले. कोलकात्याने मुंबईचा तब्बल 52 धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 113 धावांत गारद झाला. मुंबईच्या संघाला 20 षटकेही खेळता आली नाहीत.यावेळी केकेआरच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार खेळीमुळेच हा विजय संघाने मिळवला.
हे देखील वाचा-