एक्स्प्लोर

IPL 2022 : मुंबईच्या युवा खेळाडूची दमदार कामगिरी, सुनील गावस्कर म्हणतात, 'भारतासाठी सर्व फॉर्मेटमध्ये करु शकतो फलंदाजी'

Mumbai Indians Team : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खराब असली तरी त्यांच्या एका युवा फलंदाजाने दमदार कामगिरीमुळे सर्वांचेच लक्ष्य वेधले आहे.

IPL 2022 : क्रिकेटचा महासंग्राम आयपीएल (IPL 2022) सध्या सुरु असून अनेक युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. मुंबई इंडियन्स संघातून खेळणारा युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) याने देखील क्लासिक खेळ दाखवत स्वत:चं नाव केलं आहे. त्यामुळेच त्याच्या या खेळीचं कौतुक महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केलं आहे. 'तिलकला योग्य क्रिकेटचं ज्ञान असून तो भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतो', असंही ते म्हणाले आहेत. 

गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या शोमध्ये बोलताना तिलकचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, "तिलक वर्माने यंदाच्या हंगामात दिलासादायक अशी कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याने केलेली विजयी  खेळी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. तिलक संपूर्ण मैदानात फटकेबाजी करु शकतो, स्ट्राईक रोटेट करण्याचं कसबही त्याच्यात आहे. त्यामुळे भविष्यात भारतासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो एक चांगला फलंदाज होऊ शकतो '' 

तिलक वर्मा आयपीएल 2022 मध्ये 

मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये चमकलेला एक युवा तारा आहे. तिलकने हंगामातील 12 सामन्यात 40.89 च्या सरासरीने आणि 132.85 च्या स्ट्राइक रेटने 368 रन केले आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही 7 व्या स्थानावर आहे. तिलकने आयपीएल 2022 मध्ये दोन अर्धशतकं झळकावली असून 61 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. 

तिलकनं मोडला पंतचा विक्रम

तिलक वर्माने आतापर्यंत 12 सामन्यात 368 धावांचा पाऊस पाडलाय. तिलक वर्मा आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा काढणारा टीन एजर खेळाडू बनलाय. तिलक वर्माने पाच वर्षापूर्वीचा ऋषभ पंतचा (Rishabh Pant) विक्रम मोडला आहे. 2017 मध्ये दिल्लीकडून खेळताना पंतने 14 सामन्यात 366 धावा केल्या होत्या.  पृथ्वी शॉने  2019 साली 16 सामन्यांत 353 धावा चोपल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंचा विक्रम तिलक वर्माने मोडला आहे. मुंबईने तिलक वर्माला एक कोटी 70 लाख रुपयांत विकत घेतले होते. यंदाच्या हंगमात मुंबईकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये तिलक वर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. तिलक वर्माने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनाही मागे टाकलेय.  

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Family | न्यायाची प्रतीक्षा, देशमुख कुटुंबाचं अन्नत्यागाचं हत्यार Special ReportIndrajeet Sawant Threat Call Special Reportप्रशांत कोरटकरांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकीचा फोनPakistan ICC Champions Trophy | कधीही न पाहिलेल्या पाकिस्तानची सफर 'एबीपी माझा'वर Special ReportZero Hour Sangli Mahapalika Mahamudde | सांगलीकरांना पक्षीसंग्रहालयाची तीन-चार वर्षापासून प्रतीक्षा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget