एक्स्प्लोर
Advertisement
KKR vs GT, Top 10 Key Points : गुजरातचा स्पर्धेतील सहावा विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
IPL 2022, KKR vs GT: गुजरातने कोलकाता नाईट रायडर्सला 8 धावांनी मात दिली आहे.
KKR vs GT, IPL 2022 : आयपीएलच्या आजच्या सामन्यात एक रोमहर्षक लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघात पाहायला मिळाली. यावेळी गुजरातने कोलकात्यावर 8 धावांनी विजय मिळवला खरा पण सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. ज्यानंतर केकेआर आंद्रे रसेलच्या एकाकी झुंजीच्या जोरावर देखील कोलकाता 20 षटकात 148 धावाच करु शकला. ज्यामुळे त्यांचा 8 धावांनी पराभव झाला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
KKR vs GT 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. त्यानुसार आजही गुजरातने नाणेफेक जिंकत सामना जिंकला खरा पण त्यांनी आज प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये असं पहिल्यांदाच झालं.
- सामन्याचा विचार केल्यास केकेआरचा पराभव झाला खरा पण केकेआरच्या रसेलने केलेल्या अष्टपैलू खेळीची चर्चा सर्वत्रच आहे. त्याने गोलंदाजीत एका षटकात चार विकेट्स घेतल्या. तर 25 चेंडूत 48 धावा केल्या.
- सामन्यात सर्वात आधी म्हणजे गुजरातसाठी महत्तपूर्ण खेळी कर्णधार हार्दिकने केली. हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते.
- हार्दिकने 67 धावा केल्या पण त्याला साहाने 25 आणि मिलरने 27 धावांची दिलेली साथही महत्त्वपूर्ण ठरली.
- केकेआरच्या गोलंदाजीत अखेरच्या षटकात रसेलने एक,दोन नाही तर तब्बल चार विकेट्स घेत विक्रम रचला.आयपीएलमध्ये एका षटकात चार विकेट घेणारा रसेल पहिला वेगवान गोलंदाज झाला आहे.
- त्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरची सुरुवात खराब झाली असून दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्याने त्यांना मोठा तोटा झाला.
- केकेआरचे बहुतेक फलंदाज कर्णधार अय्यरसह आज फेल झाले त्यामुळे 157 धावांचे लक्ष्यही त्यांना गाठता आले नाही.
- यंदा पहिल्यांदाच संधी मिळालेल्या रिंकूने मात्र क्षेत्ररक्षणात 4 झेल घेत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
- केकेआरची सर्वात मोठी आशा असणाऱ्या रसेलने सामना जिंकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याने 25 चेंडूत 48 धावांची खेळी केली खरी पण तो विजय मिळवून देऊ शकला नाही.
- उमेश यादवनेही मोक्याच्या क्षणी एक चौकार आणि एक षटकार ठोकला. पण केकेआरचे सुरुवातीचे फलंदाज फेल गेल्यामुळे संघ सामना जिंकू शकला नाही.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement