IPL 2022 : रसेलचा भेदक मारा, असा पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज
Andre Russell, IPL 2022 : आंद्रे रसेलच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातचे फलंदाजांनी गुडघे टेकले. रसेलनं फेकलेल्या अखेरच्या षटकात चार विकेट पडल्या.
Andre Russell, IPL 2022 : आंद्रे रसेलच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातचे फलंदाजांनी गुडघे टेकले. रसेलनं फेकलेल्या अखेरच्या षटकात चार विकेट पडल्या. आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा रसेल पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला. रसेलच्या भेदक माऱ्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडलाय.
आयपीएलमध्ये एका षटकात चार विकेट घेणारा रसेल पहिला वेगवान गोलंदाज झाला आहे. याआधी एकाही गोलंदाजाला एका षटकात चार विकेट घेण्याचा कारनामा करता आलेला नाही. दोन फिरकीपटूंनी आयपीएलमध्ये एका षटकात चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 2013 मध्ये अमित मिश्राने पुण्याविरोधात एकाच षटकात चार विकेट घेतल्या होत्या. तर यंदा चाहलने केकेआरविरोधात चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
Andre Russell becomes the first ever pacer in IPL history to pick 4 wickets in an over.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 23, 2022
दरम्यान, हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पांड्याच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली. पण रसेलच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातचा संघ ढेपाळला. गुजारतच्या संघाने 157 धावांपर्यंत मजल मारली. रसेलनं अखेरच्या षटकात चार बळी घेतले. रसेलने पहिल्या चेंडूवर अभिवन मनोहरला बाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लॉकी फर्गुसनला तंबूचा रस्ता दाखवला. तिसऱ्या चेंडूवर अल्जारी जोसेफनं एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर राहुल तेवातियाने चौकार लगावला. पाचव्या चेंडूवर तेवातियाला बाद केलं. सहाव्या चेंडूवर यश दयाल यालाही बाद केले. अखेरच्या षटकात रसेलने पाच धावा देत चार विकेट घेतल्या.
Taking 4 wickets in an over in the IPL:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 23, 2022
Amit Mishra Vs Pune Warriors India (2013).
Yuzvendra Chahal Vs KKR (2022).
Andre Russell Vs Gujarat Titans (2022).