Prithvi Shaw violates code of conduct: दिल्लीच्या पृथ्वी शॉ ला 25 टक्क्यांचा दंड, आचारसंहितेचा भंग केल्यामुळं कारवाई
दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पृथ्वीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
Prithvi Shaw violates code of conduct : आयपीएल 2022 या हंगामातील 45 वा सामना लखनौ सुपरजायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सचा या मोसमातील हा 5 वा पराभव आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून लखनौ सुपरजाइंट्स 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दरम्यान, या सामन्यात दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पृथ्वीवर ही कारवाई करण्यात आली आहे. शॉ ला मॅच फी च्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पृथ्वी शॉ ला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल-1 साठी दोषी ठरवण्यात आले आहे. आचारसंहितेच्या स्तर-1 भंगासाठी, सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असतो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉने आपली चूक मान्य केली आहे.
रोमहर्षक लढतीत लखनौची दिल्लीवर मात
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर, लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार के एल राहुलच्या 77 आणि दीपक हुडाच्या 52 धावांच्या जोरावर लखनौ सुपरजाइंट्सने 20 षटकांत 3 बाद 195 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दुल ठाकूरने 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित 20 षटकांत 7 बाद 189 धावाच करु शकला. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर अक्षर पटेलने 42 धावांचे योगदान दिले. लखनौ सुपरजायंट्सकडून मोहसीन खानने सर्वाधिक 4 बळी घेतले.
सध्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 9 सामन्यातील 8 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. के एल राहुलचा संघ लखनऊ सुपरजाइंट्स आतापर्यंत 10 सामन्यांत 7 विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स (RR) 12 गुणांसह तिसऱ्या तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) 10 गुणांसह 5 व्या तर दिल्ली कॅपिटल्स (DC) 8 गुणांसह 6 व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या: