(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...
IPL 2022 : आज पुन्हा एकदा चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे. त्यांच्या समोर कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे.
Sunil Gabvaskar on Shivam Dube : आयपीएलमध्ये अनेक नवनवीन खेळाडूंना संधी मिळते, त्यातून त्यांच्या फॉर्मनेच ते भविष्यात आणखी उत्कृष्ट खेळाडू बनतात. यंदाच्या आयपीएलमध्येतर दिग्गज खेळाडूंच्या तुलनेत नवखे खेळाडूच कमाल कामगिरी करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे चेन्नईचा (CSK) अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे (Shivam Dube). आधी मुंबईतून सुरुवात केलेल्या शिवम नंतर बंगळुरुतून आणि मागील वर्षी राजस्थानमध्ये खेळल्यानंतर यंदा चेन्नईमध्ये सामिल झाला. मागील तिन्ही संघात खास कामगिरी न करु शकलेल्या शिवमने यंदा मात्र तुफान कामगिरी सुरु ठेवली आहे. शिवमच्या या फॉर्ममागील कारण माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी सांगितलं आहे. चेन्नईने शिवमला वरच्या फळीत फलंदाजीची संधी दिल्याने त्याचा फॉर्म सुधारला असल्याचं वक्तव्य गावस्कर यांनी केलं आहे.
सुनील गावस्कर हे स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह कार्यक्रमात म्हणाले, ''तो उंच असल्याने एका जागी उभा राहून चेंडूला लांब पाठवू शकतो. या हंगामात तर त्याची कामगिरी आणखी उत्तम दिसत आहे. चेन्नईने शिवमला फलंदाजीत वरच्या फळीत पाठवण्यात आल्यानेच तो यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.आधीच्या संघात त्याला अखेरच्या फळीत फलंदाजी मिळत तेव्हा त्याला 5-6 षटकचं फलंदाजीसाछी मिळत असल्याने तो खास कामगिरी करु शकत नव्हता. पण आता वर फलंदाजीला येत असल्याने त्याची कामगिरी सुधारली आहे.''
शिवमची यंदाच्या हंगामातील कामगिरी
राजस्थान रॉयल्स संघातून यंदा चेन्नईमध्ये आलेल्या शिवमसाठी चेन्नई संघाने 4 कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपरकिंग्स संघाने शिवमना यंदाच्या हंगामात 9 सामने खेळले. या सामन्यांमध्ये शिवमने 160.34 च्या स्ट्राईक रेटने 279 रन ठोकले आहेत. त्याने नाबाद 95 धावाही एका सामन्यात ठोकल्या.
हे देखील वाचा-
- Most wickets in IPL: आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय
- Ravichandran Ashwin : दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?