PAK vs ENG 2nd Test: हद्दचं झाली राव! मोहम्मद अलीनं बेन स्टोक्सवर काढला मालिका गमावल्याचा राग, त्यानं भरमैदानात...
England tour of Pakistan: पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या संघानं सलग दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेवर कब्जा केला. मु्ल्तान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला.
England tour of Pakistan: पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या संघानं सलग दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेवर कब्जा केला. मु्ल्तान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. दरम्यान, 355 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 328 धावांवर गारद झाला. या सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. परंतु, कसोटीच्या चौथ्या दिवशी असं काही आश्चर्यकारक घडलं की, इंग्लंडनं सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि काही वेळातच सामना जिंकला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूड उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्यानं चार विकेट्स घेतल्या. मुल्तान कसोटी सामन्यातील पराभव पाकिस्तानच्या संघाच्या चांगलाच जिव्हारी लागला.
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला पाकिस्तान चांगल्या लयीत दिसत होता. संघाने चौथ्या दिवसाची सुरुवात 4 गड्यांच्या मोबदल्यात 198 धावांवर केली. यानंतर 210 धावांवर पाकिस्तानने इमाम-उल-हकच्या रूपाने पाचवी विकेट गमावली. यानंतर संघाने हळूहळू 319 धावांवर 9 विकेट गमावल्या. त्याच वेळी, संघाच्या शेवटच्या विकेटपूर्वी, इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स आणि मोहम्मद अली यांच्यात काही हालचाल झाली. या गोंधळात मोहम्मद अलीने स्टोक्सशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याचे दिसून येत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओ-
— Guess Karo (@KuchNahiUkhada) December 12, 2022
मोहम्मद अलीनं काय केलं?
पाकिस्तानची अखेरची विकेट मोहम्मद अलीच्या रूपानं पडली. मोहम्मद अलीनं त्याच्या विकेटसाठी डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. डीआरएस दरम्यान अंतिम निर्णयाची प्रतीक्षा होती. दरम्यान, विजयाच्या आनंदात इंग्लंडचा कर्णधार मोहम्मद अलीशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढं गेला. मात्र, अलीनं स्टोक्सशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. दोघांमध्ये काही संवाद झाला. यानंतर स्टोक्स माघारी गेला. मात्र, अंतिम निर्णय आल्यानंतर दोन्ही संघांनी परंपरेने एकमेकांशी हस्तांदोलन केलं.
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), आगा सलमान, सौद शकील, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, झाहिद महमूद, मोहम्मद अली, अबरार अहमद.
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (विकेटकिपर), जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), विल जॅक्स, ऑली रॉबिन्सन, जॅक लीच, मार्क वुड, जेम्स अँडरसन.
हे देखील वाचा-