NZ vs IND 1st T20: वेलिंग्टनमध्ये पावसाची बॅटिंग; भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द
India tour of New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द झाल्यानं चाहत्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे.
![NZ vs IND 1st T20: वेलिंग्टनमध्ये पावसाची बॅटिंग; भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द NZ vs IND 1st T20 India vs New Zealand Match abandoned due to rain Sky Stadium Wellington NZ vs IND 1st T20: वेलिंग्टनमध्ये पावसाची बॅटिंग; भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/18/7abfb0b8834589e87bbb2c962bbee7c71668758219341581_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India tour of New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आज वेलिंग्टनमध्ये (Wellington) खेळला जाणार पहिला टी-20 सामना पावसामुळं रद्द (Abandoned) करण्यात आलाय, अशी माहिती स्पोर्ट्स इन्फो वेबसाईट क्रिकबझनं दिलीय. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 12 वाजता सुरुवात होणार होती. यापूर्वी अर्धातास नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात येणार होते. परंतु, पावसामुळं नाणेफेकही होऊ शकलं नाही. हा सामना थोड्या उशीरानं सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, वेलिंग्टन येथील सध्याचं वातावरण आणि हवामानाचा अंदाज पाहता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वेलिंग्टन येथील हवामानाचा अंदाज
हवामानाच्या ताज्या अपडेटनुसार, वेलिंग्टनमध्ये आज ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचीही मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जातेय. दुपारनंतर पाऊसासह वारा वाहण्याची शक्यता आहे. पाऊस आणि हवामानातील आर्द्रता यामुळं तापमानही 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकतं. यामुळं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
भारताचा संपूर्ण न्यूझीलंड दौरा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 13 दिवसांत 6 सामने खेळले जातील, ज्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे.
संघ-
न्यूझीलंड संघ:
डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोढी.
भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव हर्षल पटेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)