IND vs NZ 3rd ODI Weather Report: भारत-न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाऊसाचा व्यत्यय? कसं असेल इंदूरचं वातावरण
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना उद्या अर्थात 24 जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
IND vs NZ, 3rd ODI : : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना उद्या म्हणजेच 24 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारताने आधीच तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा एकदिवसीय सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. इंदूरमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड आजवर दमदार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे न्यूझीलंडला व्हाई़ट वॉश देण्यासाठी भारत तर मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी न्यूझीलंड प्रयत्न करणार आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो का यासाठी सामन्यापूर्वी आणि सामना सुरु असताना इंदूरच्या होळकर क्रिेकेट स्टेडियमचे हवामान कसे असेल पाऊस व्यत्यय आणू शकतो का ते पाहूया...
हा सामना दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होईल. सामन्याच्या दिवशी येथील हवामानात काहीसा उष्मा दिसून येणार आहे. 24 जानेवारीला कमाल तापमान 28 अंशांपर्यंत राहील. त्याच वेळी, किमान तापमान 13 अंशांच्या आसपास असेल. विशेष म्हणजे सामन्यादरम्यान कोणत्याही प्रकारे पावसाची शक्यता नाही. त्यामुळे एक संपूर्ण 50 षटकांचा रंगतदार सामना क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळू शकतो.
कसा असेल पिच रिपोर्ट?
इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय येथील चौकारही लहान असल्याने फलंदाजांना खूप मदत मिळते. वेगवान गोलंदाजांना देखील काही प्रमाणात मदत मिळते. मात्र धावा वाचवण्यासाठी गोलंदाजांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या एकूण पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे. त्यामुळे एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करणे फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक
न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले
हे देखील वाचा-