IND vs SA: कटक टी-20 सामन्यात हजारो प्रेक्षकांनी गायलं 'माँ तुझे सलाम!', पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
IND vs SA: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि यष्टरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे.
IND vs SA: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि यष्टरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात भारतीय संघाला पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. कटक येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी फ्लॉप ठरली. परंतु, या सामन्यादरम्यानचा अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यात हजारो प्रेक्षक भारतीय संघाचं मनोबल वाढवण्यासाठी 'माँ तुझे सलाम' हे गाणं गाताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना सुरु होण्यापूर्वीचा आहे. पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवावा, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. त्यामुळं त्यांनी मैदानातच एकसुरात 'माँ तुझे सलाम' हे गीत गायलं. एवढेच नव्हेतर प्रेक्षक आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट चालू करून भारतीय संघाला पाठिंबा दर्शवत होते. असेच एक दृश्य एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यादरम्यान पाहायला मिळालं.
पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ-
भारताचा चार विकेट्सनं पराभव
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 18.2 षटकात भारतानं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात हेन्रिक क्लासेननं महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताल पराभूत करून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-0 नं आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना 14 जूनला खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवणं अनिवार्य असणार आहे. तर, तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून मालिका खिश्यात घालण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असणार आहे.
हे देखील वाचा-