IND Vs SA, 2nd T20: ऋषभ पंतचा तो निर्णय चुकला! भारताच्या पराभवानंतर दिग्गज क्रिकेटपटूंची संतप्त प्रतिक्रिया
IND Vs SA, 2nd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात कटक (Cuttack) येथे दुसरा टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताला चार विकेट्सनं पराभव पत्कारावा लागला.
IND Vs SA, 2nd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात कटक (Cuttack) येथे दुसरा टी-20 सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताला चार विकेट्सनं पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ 2-0 नं पिछाडीवर गेलाय. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाची धुरा संभाळणाऱ्या ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत. या सामन्यात दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आधी अक्षर पटेलला (Axar Patel) फलंदाजी पाठवल्यामुळं अनेक दिग्गज क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसतायेत.
ऋषभ पंतचा निर्णय
भारताच्या डावातील 13 व्या षटकात ऋषभ पंतनं अक्षर पटेलला फलंदाजी करण्यासाठी पाठवलं. परंतु, ऋषभ पंतचा हा निर्णय फसला. अक्षर पटेल फक्त नऊ धावा करून माघारी परतला. तर, दिनेश कार्तिकनं 21 चेंडूत नाबाद 30 धावांची खेळी केली.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर म्हणाले की, "अक्षर पटेलच्या आधी दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी पाठवायला हवं होतं. “कधीकधी तुम्ही खेळाडूंवर फिनिशर असल्याचा टॅग लावता. तसेच 15 व्या षटकानंतरच त्याला फलंदाजीला पाठवता येईल, असा विश्वास दाखवता. पण गरज भासल्यास अशा खेळाडूला लवकर पाठवण्याची गरज असते. त्याच्या मते तो खेळ समजून डाव पुढे घेऊन जाता येतो."
ग्रीम स्मिथला आश्चर्याचा धक्का
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रीम स्मिथलाही ऋषभ पंतचा निर्णय समजला नाही. "मला हे कळालं नाही, दिनेश कार्तिक भारतीय संघाचा सर्वात अनुभवी खेळाडूपैकी एक आहे. त्यानं भारतीय संघासाठी अनेक सामने खेळले आहेत. त्याच्या आधी अक्षर पटेलला फलंदाजी करण्यासाठी कसं पाठवू शकतात?"
गौतम गंभीर काय म्हणाला?
गौतम गंभीरनंही ऋषभ पंतच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलाय. "तुम्ही कार्तिकला फक्त शेवटच्या तीन षटकांसाठी ठेवू शकत नाही. जर तुमच्याकडं फलंदाज असतील, तर त्याला 6 व्या क्रमांकावर पाठवा. कठीण परिस्थितीत तुम्हाला अधिक संधी असते", असं गंभीरनं म्हटलंय.
हे देखील वाचा-