IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचे अनेक फायदे; न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणनं सांगितलं कारण
India Tour Of New Zealand: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची टी-20 आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
India Tour Of New Zealand: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची टी-20 आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, सलामीवीर शिखर धवनकडं (Shikhar Dhawan) एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवलं गेलं आहे. याशिवाय, भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी लक्ष्मणनं हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचे अनेक फायदे सांगितले आहेत.
हार्दिक पांड्यात एक उत्कृष्ट कर्णधार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात आपण पाहिलं की,त्यानं कशाप्रकारे गुजरातच्या संघाला विजय मिळवून दिला. आयर्लंड दौऱ्यातही मी त्याच्यासोबत खूप वेळ घातलाय. तो रणनीती बनवण्यात खूप चांगला आहे. यासोबतच तो मैदानावरही खूप शांत राहतो. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असता तेव्हा ते खूप महत्त्वाचं ठरतं. कारण कधी-कधी अशी परिस्थिती येते की, तुम्हाला एक लीडर म्हणून शांत राहाणं गरजेचं असतं. ड्रेसिंग रूममध्ये त्याची उपस्थिती आणि खेळाबद्दलची आवड अनुकरणीय आहे. तो ज्या पद्धतीनं मैदानात संघाचं नेतृत्व करतो, ते आश्चर्यकारक आहे. तो खेळाडूंचा कर्णधार आहे,मनमिळावू आहे. सहकारी खेळाडूंचा त्याच्यावर विश्वास आहे आणि याच गोष्टींमुळे मला तो कर्णधार म्हणून आवडतो", असं लक्ष्मणनं म्हटलंय.
रवी शास्त्रींची हार्दिक पांड्यावर स्तुतीसुमनं
"टी-20 क्रिकेटसाठी नवीन कर्णधाराची नियुक्ती करणं हा तोट्याचा सौदा ठरणार नाही. येथे इतकं क्रिकेट खेळलं जात आहे की. एका खेळाडूसाठी तिन्ही फॉरमॅट खेळणं कधीही सोपं नसतं. जर रोहित कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करत असेल तर नवीन टी-20 कर्णधाराची निवड करण्यात काही गैर नाही, जेव्हा त्याचं नाव हार्दिक पांड्या असेल."
भारताचा न्यूझीलंड दौरा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 13 दिवसांत 6 सामने खेळले जातील, ज्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे.
हे देखील वाचा: