IND vs NZ 1st t20 Highlights: वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी व्यर्थ, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय
IND vs NZ 1st T20: वॉशिंगटन सुंदर याने अर्धशतकासोबत दोन विकेट घेत अष्टपैलू खेळी केली होती. पण इतर फंलदाजांनी आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी न केल्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
![IND vs NZ 1st t20 Highlights: वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी व्यर्थ, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय IND vs NZ 1st T20 Match Highlights New Zealand Won Match By 21 Runs Against India washington Sundar Half Century IND vs NZ 1st t20 Highlights: वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी व्यर्थ, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/27/26677988d4b6e1fbfd4ee41ce88563e51674839001480333_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs New Zealand 1st T20I Ranchi: वॉशिंगटन सुंदरची अष्टपैलू खेळी व्यर्थ गेली आहे. आघाडीचे फलंदाजळ अपयशी ठरल्यामुळे टीम इंडियाचा पहिल्या टी 20 सामन्यात 21 धावांनी पराभव झाला आहे. वॉशिंगटन सुंदर याने अर्धशतकासोबत दोन विकेट घेत अष्टपैलू खेळी केली होती. पण इतर फंलदाजांनी आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी न केल्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सेंटनर याने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय डॅरिल मिशेल आणि डेवेन कॉन्वे यांनी वादळी अर्थशतके झळकावलं.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 176 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडची सुरुवात वादळी झाली होती. फिन अॅलन आणि कॉन्वे यांनी सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. 4 षटकात 43 धावा चोपल्या होत्या. वॉशिंगटन सुंदर याने ही जोडी फोडत भारताला पहिलं यश मिळवून दिले होते. त्यानंतर मार्क चाम्पन यालाही सुंदरने स्वस्तात माघारी झाडले... तर कुलदीप यादव याने ग्लेन फिलीप्सला बाद केले.. लागोपाठ विकेट पडल्यामुळे न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला होता. पण अखेरीस डॅरिल मिचेल याने 30 चेंडूत 59 धावांची खेळी करत न्यूझीलंडला सन्माजनक धावसंख्या पर्यंत पोहचवलं. डॅरिल मिचेल आणि कॉन्वे यांनी अर्धशतकी खेळी केली. तर फिन अॅलने याने 35 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंगटन सुंदर याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि शिवम मावी यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
न्यूझीलंडने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. गिल आणि इशान किशन यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. राहुल त्रिपाठीही एकही धाव न काढता बाद झाला. तीस धावांच्या आत भारताच्या तीन विकेट पडल्या होत्या... सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला... पण एकापाठोपाठ एक त्यांच्याही विकेट काढण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आले. दीपक हुड्डालाही लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताचा मोठ्या धावसंख्येनं पराभव होणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण वॉशिंगटन सुंदर याने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. पण दुसऱ्या बाजूने साथ न मिळाली नाही.. एकापाठोपाठ एक विकेट पडल्या.... भारताचा डाव155 धावांपर्यंत पोहचला... न्यूझीलंडने हा सामना 21 धावांनी जिंकला...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)