ENG vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध अद्भुत विजयानंतरही इंग्लंडला मोठा झटका, दंडासह WTC चे गुणही कापणार
न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळे आयसीसीने इंग्लंडच्या खेळाडूंची 40 टक्के मॅच फी कापण्याचा निर्णय घेतला आहे.
World Test Championship : न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध ट्रेंट ब्रिज टेस्ट (Trent Bridge Test) सामन्यात इंग्लंडने अप्रतिम विजय मिळवला. पण या दमदार विजयानंतरही इंग्लंड संघाला (England Team) मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडने स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) ठेवल्यामुळे इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत 2 गुणांचं नुकसान झालं आहे. तसंच खेळाडूंची मॅच फि देखील कापण्यात आली आहे. ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये मॅच रेफरी रिची रिचर्ड्सन (Richie Richardson) यांनी इंग्लंडविरुद्ध हा निर्णय सुनावला. इंग्लंडचा संघ निर्धारीत षटकांपेक्षा 2 ओव्हरने मागे होता, ज्यामुळे रेफरी रिचर्ड्सन (Richie Richardson) यांनी हा निर्णय दिला.
WTC प्वॉइंट्स टेबलमध्ये इंग्लंड 8 व्या नंबरवर
इंग्लंडचा संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) आठव्या स्थानावर आहे. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडचे 2 प्वॉइंट्स कापण्यात आले आहेत. पण यानंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेत (Points Table) इंग्लंडच्या स्थितीत बदल झालेला नाही. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्वॉइंट्स टेबलशिवाय असणाऱ्या परसेंटेज प्वॉइंट्समध्ये (Percentage Points) इंग्लंडला तोटा झाला आहे.
इंग्लंडच्या खेळाडूंच्या मॅच फीमध्येही कपात
अप्रतिम खेळ दाखवून इंग्लंडच्या खेळाडूंनी न्यूझीलंडवर विजय मिळवला तरी आयसीसीने (International Cricket Council) स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळे खेळाडूंची 40 टक्के मॅच फी कापली आहे. आयसीसीने एक आर्टिकल 16.11.2 बनवलं असून या आर्टीकलनुसार निर्धारीत वेळेत जितके कमी ओव्हर टाकले जाणार तितके WTC प्वॉईट्स कापणार. त्यामुळेच इंग्लंडचे दोन गुण कापण्यात आले असून खेळाडूंनाही 40 टक्के फि कापण्याचा दंड लावण्यात आला आहे.
हे देखील वाचा-
- IPL सामन्यात फेकलेल्या एका बॉलमधून बीसीसीआयला मिळणार 49 लाख; एका सामन्यातून होणार 118 कोटींचा फायदा
- IPL Media Rights Auction : बीसीसीआयची चांदीच-चांदी; 44 हजार कोटींच्या घरात विकले गेले मीडिया राईट्स, एका सामन्यातून 100 कोटींहून अधिकची होणार कमाई
- IND vs SA: कटक टी-20 सामन्यात हजारो प्रेक्षकांनी गायलं 'माँ तुझे सलाम!', पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ