एक्स्प्लोर

'आप'ने महाराष्ट्र विधानसभेसाठी शड्डू ठोकला, अरविंद केजरीवालांचा तिसरा उमेदवार जाहीर

Arvind Kejriwal Three Candidate Announced : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Vidhansabha Election) शड्डू ठोकलाय. केजरीवालांच्या आपकडून आज (दि.25) तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आलाय.

Arvind Kejriwal Three Candidate Announced : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Vidhansabha Election) शड्डू ठोकलाय. केजरीवालांच्या आपकडून आज (दि.25) तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. आपकडून परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आप उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 बीड, लातूर पाठोपाठ परभणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 

विधानसभा महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांबरोबरच आता आम आदमी पार्टीने विधानसभेसाठी कंबर कसलीये. मराठवाड्यातील तीन जागा आम आदमी पार्टीने जाहीर केल्यात बीड, लातूर पाठोपाठ परभणी विधानसभेचा उमेदवार आम आदमी पार्टीच्या राज्य संघटकांकडून जाहीर करण्यात आलाय. परभणीत पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे देशात जरी आम आदमी पार्टी इंडिया अलायन्स बरोबर असली तरी महाराष्ट्रात मात्र ते विधानसभेच्या 288 जागा स्वतंत्र लढणार हे स्पष्ट झालंय.

 मुंबईतील 36 जागा लढण्याची तयारी आम्ही केली : प्रीती शर्मा

काही दिवसांपूर्वी आप नेत्या प्रीती शर्मा यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आम्ही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. प्रीती शर्मा म्हणाल्या होत्या की, आगामी विधानसभा निवडणुका आम्ही आम आदमी पार्टी एकट्याने लढायच्या तयारीत आहोत. आम आदमी पार्टी या शतकातील सर्वात यशस्वी  राजकीय पक्ष आहे. फक्त 2012 मध्ये स्थापन झालेल्या राजकीय पक्षाने आतापर्यंत दोन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मुंबईतील 36 जागा लढण्याची तयारी आम्ही केली आहे. 

राज ठाकरे उमेदवार जाहीर करण्यात आघाडीवर 

महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वात आघाडीवर आहे. राज ठाकरेंनी आत्तापर्यंत 7 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीशिवाय आणखी दोन महत्वाचे पक्ष स्वबळावर निवडणूक लढतील, हे स्पष्ट झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

PM Narendra Modi : महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये; पंतप्रधान मोदींचं परखड भाष्य

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपVijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget