Ajit Pawar- Eknath Shinde : दादा म्हणाले, मै रुकनेवाला नहीं, शपथ घेणारच, शिंदे म्हणाले, त्यांना सकाळ-संध्याकाळच्या शपथेचा अनुभव, एकच हास्यकल्लोळ!
Ajit Pawar- Eknath Shinde : महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मिश्लिक टोलेबाजी पाहायला मिळाली.
मुंबई : मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय...संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळेल. त्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं की, संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल, पर मैं तो रुकनेवाला नहीं, मी तर शपथ घेणारच आहे.. अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, दादांना अनुभव आहे..सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा... त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यात दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. असं असलं तरीही मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सामील होणार का? यावर अद्यापही प्रश्न असल्याचं चित्र आहे. कारण महायुतीच्या पत्रकार परिषदेमधील शिंदेंच्याच वक्तव्यामुळे या चर्चांना उधाण आलंय. त्यातच याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मिश्लिक टोलेबाजीही झाल्याचं पाहायला मिळालं.
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्बत झाल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण महायुतीची नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, 'मी काल स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तुम्ही स्वत: या सरकारमध्ये आमच्यासोबत राहायला हवं, असं निवदेन मी एकनाथरावांना केलंय.. एकनाथ शिंदेंनीही सरकारमध्ये राहावं, अशी शिवसेनेच्या आमदारांची देखील इच्छा आहे. महायुतीच्या आमदारांची देखील हीच इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, ते आमच्या सरकारमध्ये असतील.' फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीच्या मंत्रीमंडळात असणार की नाही हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झालाय.
संध्याकाळपर्यंत सांगतो - एकनाथ शिंदे
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनाही तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, अडीच वर्षांपूर्वी याच ठिकाणी मी मुख्यमंत्री व्हावं ही शिफारस देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी मी शिफारस केली आहे. देवेंद्रजींनीही आता सांगितलं..संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळं कळेलच...
ही बातमी वाचा :