एक्स्प्लोर

आरे कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवावी, सरकार त्यावर नक्की विचार करेल : आदित्य ठाकरे

आरे कारशेडबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं मत मांडलं आहे. कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवावी. सरकार त्यावर नक्की विचार करेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई : मुंबई मेट्रो-3 साठीचं आरे कॉलनीमध्ये असलेले नियोजित कारशेड पर्यायी जागी हलवावं, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. या मागणीचा विचार करत पर्यावरण मंत्री आदित्यू  ठाकरे यांनी आरे कारशेड इतरत्र हलवण्यास सहमती दर्शवली आहे, मात्र तज्ञ्जांनी पर्यायी जागा सुचवावी असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

आदित्य ठाकरे फोरम ऑफ एन्वायरमेन्टल जर्नलिस्ट्स इन इंडियाचे सहसचिव अतुल देऊळगावकर यांनी सादर केलेल्या निवेदनावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आरे कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सूचवावी. सरकार त्यावर नक्की विचार करेल. सरकारची तशी तयारी आहे. याशिवाय, राज्यभरात येत्या वर्षभरात इलेक्ट्रीक बसेस संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं, आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

आरेचं संरक्षण करण्यासाठी पर्यावरण मंत्री नात्याने आदित्य ठाकरे यांनी तातडीने पावलं उचलावी. याशिवाय मोठे प्रकल्प सुरु असताना त्याठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा आणि बस लेन यांची व्यवस्था करावी, जेणेकरुन खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. सध्याची पाणीटंचाईची समस्या, वायू प्रदूषण याकडे लक्ष देण्याचं आवाहनं अतुल देऊळगावकर यांनी केलं.

मेट्रो कारशेड समितीचा अहवाल सादर, आरेमध्येच काम सुरु ठेवण्याची शिफारस

आरे कारशेडला तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवावी, सरकार त्यावर नक्की विचार करेल : आदित्य ठाकरे

मेट्रो 3 चं कारशेड इतरत्र हलवणं व्यवहार्य नाही : मेट्रो कारशेड समिती 

याआधी, मुंबईतील मेट्रो 3 चं कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही. त्यामुळे आरे कॉलनीमध्येच कारशेडचं काम सुरु करावं, अशी शिफारस चार सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) मनोज सौनिक यांनी समितीचा अहवाल मंगळवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवला. 33.5 किमीचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाचं कारशेड इतरत्र हलवणं व्यवहार्य नाही. समितीला कारशेडसाठी पर्यायी जागा सापडलेली नाही.

आरे सोडून कांजूरमार्ग किंवा इतर ठिकाणी कारशेड हलवल्यास सरकारी तिजोरीवर हजारो कोटींचा भार पडणार असल्याचं समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे अडथळे, वाढणारा खर्च आणि प्रकल्पाला होणारा उशीर टाळण्यासाठी कारशेड आरेमध्येच व्हावं, अशी शिफारस समितीने केली आहे.

मेट्रो कारशेडसाठी ऑक्टोबर 2019 मध्ये आरेमधील झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली. यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. पर्यावरणप्रेमींसह शिवसेनेनेही या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता. यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2019 मध्ये मेट्रो कारशेडला पर्यायी जागा शोधण्यासाठी समिती नेमण्यात आली होती.

संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad News: मुलं बुडताना अजिबात आवाज झाला नाही, काठावर चपला सापडल्या; रायगडच्या धावरी नदीत चिमुकल्या भावा-बहिणीचा करुण अंत
मुलं बुडताना अजिबात आवाज झाला नाही, काठावर चपला सापडल्या; रायगडच्या धावरी नदीत चिमुकल्या भावा-बहिणीचा करुण अंत
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; नेटकरी म्हणाले,
राखी सावंतची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; नेटकरी म्हणाले,"पब्लिसिटी स्टंट"
Happy Birthday Madhuri Dixit : 'तेजाब' ते 'देवदास'; माधुरी दीक्षितचे 'TOP 10' चित्रपट पाहिलेत का?
'तेजाब' ते 'देवदास'; माधुरी दीक्षितचे 'TOP 10' चित्रपट पाहिलेत का?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 15 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad News: मुलं बुडताना अजिबात आवाज झाला नाही, काठावर चपला सापडल्या; रायगडच्या धावरी नदीत चिमुकल्या भावा-बहिणीचा करुण अंत
मुलं बुडताना अजिबात आवाज झाला नाही, काठावर चपला सापडल्या; रायगडच्या धावरी नदीत चिमुकल्या भावा-बहिणीचा करुण अंत
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर! नाशिक, मुंबईत भव्य रोड शो, सभांचा धडाका
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; नेटकरी म्हणाले,
राखी सावंतची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; नेटकरी म्हणाले,"पब्लिसिटी स्टंट"
Happy Birthday Madhuri Dixit : 'तेजाब' ते 'देवदास'; माधुरी दीक्षितचे 'TOP 10' चित्रपट पाहिलेत का?
'तेजाब' ते 'देवदास'; माधुरी दीक्षितचे 'TOP 10' चित्रपट पाहिलेत का?
Horoscope Today 15 May 2024 : आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; फक्त 'या' एका गोष्टीपासून सावध, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; फक्त 'या' एका गोष्टीपासून सावध, वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
PM Modi Jiretop: प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड
प्रफुल पटेलांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला; शिवप्रेमी संतापले, विरोधकांची आगपाखड
Maharashtra News LIVE Updates: पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिक आणि मुंबईमध्ये उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार
Maharashtra News LIVE Updates: पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिक आणि मुंबईमध्ये उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार
Embed widget