![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Tokyo Olympics Women's Hockey : भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदक हुकलं, ब्रिटनकडून 4-3 असा पराभव
Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून 4-3 असा पराभव झाला. इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला संघानं कांस्य पदकासाठीच्या या लढतीत शानदार कामगिरी केली मात्र एका गोलच्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पुरुष हॉकी संघानं 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरल्यानंतर आज महिला संघाकडून महिला हॉकीतील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र ते अपुरे पडले.
सामन्याच्या सुरुवातीला ब्रिटननं आक्रमक खेळी केली. ब्रिटननं सामन्यात 2-0नं आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं सलग तीन गोल करत 3-2 अशी आघाडी घेतली. मात्र ही आघाडी भारतीय महिलांना टिकवता आली नाही. ब्रिटननं पुन्हा वापसी करत सलग दोन गोल डागले आणि 4-3 अशी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत गेल्यावेळच्या गोल्ड मेडल विनर ग्रेट ब्रिटननं कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केलं.
![Virat Kolhi Cotch : विराटच्या निवृत्तीच्या निर्णयावर त्याचे कोच काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a8c6cb035922a88c0bc8d9dfa1b538dd1719753577349977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Team India Win : सूर्याचे कोच 'माझा'वर सांगितला 'तो' किस्सा ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/d4480c25313688c1c7085a8cb16f34281719753392187977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Team India Win : रोहितचा कोच 'माझा'वर सांगितला खास किस्सा ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a697bea6fc57d9b69888370483f97cf61719751475955977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Team India Special Report : सूर्यानं घेतलेला कॅच अंतिम सामन्यातला टर्निंग पॉईंट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a48b47a13467819f49da0e316ca9e1931719745874130977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/d3e75f98158c59184a7900bfe0586ac71719686919819977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)