पंतप्रधान मोदींकडून भारतीय हाॅकी संघाचं कौतुक,पंतप्रधानांचा खेळाडूंशी फोनवरून अभिनंदन! ABP Majha
भारतीय पुरुष हॉकी संघाने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. हॉकी संघाने जर्मनीला 5-4 ने हरवून कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये, पुरुष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. संपूर्ण देश हॉकी संघाचा हा जबरदस्त विजय साजरा करत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा पंतप्रधान मोदींशी बोलतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.
हॉकी संघाने आज जे काही केले, त्यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी कॅप्टन मनप्रीत सिंग यांना फोनवर म्हणता, की "मनप्रीत खूप अभिनंदन. तुम्ही आणि संपूर्ण टीमने जे केले, त्यानंतर संपूर्ण देश नाचत आहे. संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. माझ्याकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन करा." मोदी पुढे म्हणाले, की "आज संपूर्ण देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे."


















