Neeraj Chopra: नीरजच्या खांदरा गावचं मराठी कनेक्शन! माझाच्या कॅमेऱ्यासमोर ग्रामस्थांनी उलगडला इतिहास
Neeraj Chopra wins Gold Medal : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरजनं भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, आणि १२५ वर्षांची प्रतीक्षा संपली... ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राचं मराठी कनेक्शन त्याच्या ग्रामस्थांनी एबीपी माझाशी बोलताना उलगडून दाखवलंय... नीरज चोप्राचं मूळ गाव असलेल्या हरियाणातल्या खांदरा गावात एबीपी माझाची टीम पोहोचलीय.. विशेष म्हणजे कालच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएमार्फत नीरजच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि महाराष्ट्रात नीरजचा गौरव करण्याची इच्छा व्यक्त केली.. दरम्यान नीरजच्या कामगिरीनंतर खांदरा गावात जणू दिवाळी साजरी केली जातेय..


















