Mirabai Chanu : वेटलिफ्टर मीनाबाई चानूचं इम्फाळमध्ये आगमन, स्वागताला मणिपूरचे मुख्यमंत्री उपस्थित
टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. आज मीराबाई चानूचं इम्फाळमध्ये आगमन झालं त्यावेळी स्वागताला मणिपूरचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या


















