KKR vs DC, Match Highlights: कोलकात्याची दिल्लीवर 3 विकेट्सनी मात; कोलकात्याची आयपीएल फायनलमध्ये धडक
आयपीएलच्या चौदाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा मुकाबला ऑईन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. कोलकात्यानं क्वालिफायर टू सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ३ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी दिल्लीला २० षटकांत पाच बाद १३५ धावांत रोखून निम्मी लढाई जिंकली. मग शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी ९६ धावांची सलामी देऊन कोलकात्याच्या विजयाचा पाया घातला. त्यानंतर कोलकात्यानं विजयासाठीचं १३६ धावांचं आव्हान शेवटच्या षटकांत पार केलं. दोन चेंडूत ६ धावांची गरज असताना राहुल त्रिपाठीनं षटकार ठोकत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
