T20 World Cup Final Match :टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडचा मुकाबला
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रविवारच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा मुकाबला आता इंग्लंडशी होईल. या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांचं आव्हान दिलं होतं. कर्णधार जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सनं अभेद्य सलामी देऊन इंग्लंडच्या निर्विवाद विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडनं चार षटकं राखूनच आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं भारताचा पराभव अतिशय लाजिरवाणा ठरला. कारण भारतीय गोलंदाजांना या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. त्याआधी, भारतानं २० षटकांत सहा बाद १६८ धावांची मजल मारली. भारताकडून विराट कोहलीनं ४० चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ५० धावांची खेळी उभारली. हार्दिक पंड्यानं ३३ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांसह ६३ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या























