Sunil Gavaskar on Team India : IPL मध्ये खेळताना थकवा जाणवला नाही का? गावस्करांनी खेळाडूंना झापलं
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर सारेच तुटून पडले होते. हिंदुस्थानच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाचेच नव्हे तर अपयशी खेळाडूंवर अक्षरश: तोंडसुख घेतलं. यात आता सुनील गावस्करांनी देखील उडी घेतलीय. गावस्करांनी तर भारतीय खेळाडूंवर चांगलेच बरसलेत.. याआधी आयपीएलमध्ये तुम्ही इथे-तिथे धावत होता, तेव्हा तुम्हाला थकवा जाणवला नाही का? तेव्हा तुमच्यावर दबाव नसतो?, मात्र जेव्हा तुम्ही देशासाठी एखाद्या नॉनग्लॅमरस देशात जाता तेव्हा तुमच्यावर क्रिकेटचा अतिताण असतो? ही चुकीची गोष्ट आहे. अशा शब्दात गावस्कारांनी भारतीय खेळाडूंना चांगलचं झापलंय. तसंच बीसीसीआयने या क्रिकेटपटूंचा चांगला समाचार घेत त्यांना एक खणखणीत संदेश देण्याची गरज आहे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय.






















