IND Vs AUS 4th Test, Day 1 | पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 5 बाद 274 धावा, मार्नस लाबूशेनचं शतक
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाने गाजवला. पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलियाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 274 धावा केल्या आहेत. सध्या कॅमरुन ग्रीन 28 धावा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन 38 धावा करुन नाबाद आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता सुरु होईल.
मार्नस लाबुशेनने दमदार शतक केलं. त्याने 204 चेंडूत 108 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू वेड 87 चेंडूत 45 धावा आणि स्टीव्ह स्मिथने 77 चेंडूत 36 धावा केल्या. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या टी नटराजनने दोन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.























