हिला प्रीमियर लीगसाठी सुरू असलेल्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत मराठमोळ्या स्मृती मानधना सर्वाधिक बोलीची मानकरी ठरलीय... तब्बल ३ कोटी ४० लाखांची बोली आर.सी.बी.ने खिशात टाकलीय... यासाठी मुंबई इंडियन्स आणि आर.सी.बी. यांच्यात लिलावयुद्ध रंगलं होतं... बीसीसीआय यंदा प्रथमच महिला आयपीएल स्पर्धा भरवतंय... ही स्पर्धा 4 ते 26 मार्च दरम्यान होणाराय... एकूण 22 सामने होतील... पहिल्या हंगामात दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद आणि लखनऊचे संघ खेळतील... लिलाव प्रक्रियेत एकूण 1 हजार 525 खेळाडूंनी नावे नोंदवली होती... त्यातील 409 खेळाडूंची निवड झाली होती...