Smriti Mandhana : सांगलीच्या स्मृती मानधनानं रचला इतिहास, पिंक बॉल कसोटीत शतक, कुटुंबियाशी खास संवाद
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधनानं विक्रम केला आहे. ती पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची स्थिती मजबूत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये (India vs Australia) सुरु असलेल्या एकमेव पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारतानं आतापर्यंत पहिल्या डावात एक विकेट गमावत 158 धावा केल्या आहेत.
यात स्मृतीच्या (Smriti Mandhana) शतकाचा समावेश आहे. स्मृती मानधानने सर्वोत्कृष्ट खेळी करत पहिल्या दिवसअखेर नाबाद 80 धावा पहिल्या दिवशी केल्या आहे. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवण्यात आला होता. पहिल्या दिवशी एक विकेटच्या बदल्यात 132 धावा केल्या होत्या. भारताची सलामीवीर शफाली 64 चेंडूत 31 धावा केल्या. भारताची सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मानं 93 धावांची दमदार सलामी दिली. शफाली बाद झाल्यानंतर आलेल्या पूनम राऊत सोबत स्मृती मानधनानं भारताच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत 55 षटकात भारतानं स्मृती नाबाद 102 आणि पूनम राऊत 19 धावांवर खेळत आहे.