भारताच्या कसोटी संघाची लवकरच घोषणा, कसोटी कर्णधारपदी Ajinkya Rahane की Rohit Sharma ला संधी?
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आता लवकरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीचा संघही जाहीर होण्याची शक्यता आहे. उभय संघांत २५ ते २९ नोव्हेंबर आणि ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत दोन कसोटी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी कानपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळं पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणेचीच निवड होणार की रोहित शर्मा नेतृत्वाची संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांपाठोपाठ कसोटी मालिकेतही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण रिषभ पंत, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरसारख्या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.