IND Vs AUS 2nd Test | भारताचा ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय, मालिकेत बरोबरी
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारताने विजय नोंदवला आहे. भारताने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी केली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 70 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमन गिलने नाबाद 35 आणि अजिंक्य रहाणेने नाबाद 27 धावा केल्या. अॅडलेड कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्याने टीम इंडियासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा होता.























