Who Is Nikhil Sosale? : चेंगराचेंगरी प्रकरण; बंगळुरू विमानतळावरुन अटक, कोण आहे निखिल सोसाळे?
Who Is Nikhil Sosale? : चेंगराचेंगरी प्रकरण; बंगळुरू विमानतळावरुन अटक, कोण आहे निखिल सोसाळे?
RCB Marketing Head Nikhil Sosale Arrested: आयपीएलच्या (IPL 2025) मैदानात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bengaluru) अखेर यंदाच्या वर्षी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आणि 18 वर्षांनी ट्रॉफीवर कब्जा केला. या विजयोत्सवाचं सेलिब्रेशन बंगळुरुमध्ये (Bengaluru) झालं. ज्याला चेंगराचेंगरीचं (Bengaluru Stampede) गालबोट लागलं. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन, यंत्रणेविरोधात संतापाची लाट आहे. जे निष्पाप 11 जीव गेले, त्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल आता विचारला जातोय. अशातच बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी आरसीबीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आरसीबी, इव्हेंट मॅनेजर, केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध क्यूबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेला. आता याप्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला (RCB Marketing Head Nikhil Sosale) बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तर, आरसीबीचे आणखी तीन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला अटक करण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणी आरसीबीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता एकंदरीतच बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आयपीएल फ्रँचायझीचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता आरसीबी मार्केटिंग हेड निखिल सोसाळे आणि त्याची पत्नी, अनुष्का शर्माची घनिष्ट मैत्रीण मालविका नायकही (Malvika Nayak) चर्चेत आले आहेत. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात सविस्तर...
आरसीबी मार्केटिंग हेड निखिल सोसाळे कोण?
निखिल सोसाळे हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्केटिंग आणि रेवेन्यू प्रमुख आहेत. निखिल सोसाळे हे आरसीबीचे एक प्रमुख सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत, जे बंगळुरूस्थित फ्रँचायझीसाठी सर्व पीआर आणि ब्रँड मार्केटिंग व्यवस्थापित करतात.
निखिल सोसाळे हे आरसीबीच्या ब्रँड मार्केटिंगसाठी मोलाची भूमिका साकारतात. आयपीएलमध्ये संघाला आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून प्रमोट करण्यासाठी सर्व रणनीती आखण्याची जबाबदारी निखिल सोसाळे असतात. निखिल सोसाळे ही अशी व्यक्ती आहे, जे आरसीबीनं त्यांचं ब्रँड मूल्य कायम ठेवलं पाहिजे आणि ते ऑरगॅनिकरित्या वाढत राहावं याची खात्री करतात.
दरम्यान, आरसीबी मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला अटक झाल्यानंतर आता त्याची पत्नी मालविका नायकही चर्चेत आली आहे. आता मालविका नायक ही नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. तर, आरसीबीच्या प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या बाजूला बसणारी ती महिला म्हणजे, मालविका नायक. निखिल सोसाळेची पत्नी मालविका नायक अनुष्का शर्माची घनिष्ट मैत्रीण असल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच मालविकाचे काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणसोबतचे फोटोही व्हायरल झालेले.
























