एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : सुभाष देशमुखांचा बंगला बेकायदेशीरच?
सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील बंगला कायदेशीर असल्याचं स्वत: देशमुख सांगत असले, तरी एबीपी माझाच्या हाती लागलेली कागदपत्रं मात्र काही वेगळंच दर्शवत आहेत.
देशमुख यांना 2001 मध्ये बंगल्याच्या बांधकामासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर देशमुख यांनी पुढील प्रत्येक बाबीला आपण जबाबदार राहू असं प्रतिज्ञापत्र दिलं. त्या आधारावर सोलापूर महानगरपालिकेने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना सशर्त बांधकाम परवाना दिला.
मात्र, आजही या जागेवरचं आरक्षण कायम आहे. या जागेवर अग्नीशमन दल, भाजी मार्केट आणि व्यावसायिक गाळ्यांसाठी आरक्षण आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचं फर्मान पालिका आयुक्तांनी पाठवलंय.
2004 साली वन बीएचके बांधकाम करण्यासाठी मनपाने सशर्त परवाना दिला. सुभाष देशमुखांनी 2011 साली पुन्हा सुधारित बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला. ज्यात तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील आलिशान बांधकामाचा उल्लेख होता. तेव्हाही महानगरपालिकेने सशर्त परवाना दिला. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रावरून या बांधकामात कायद्याचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट होतं.
होटगी रोडवरच्या वादग्रस्त बांधकामाबद्दल काँग्रेस नगरसेविका परवीन ईनामदार यांनी जानेवारी महिन्यात आंदोलन केलं. मनपाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करुन सहकार मंत्र्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. पण पालिका प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही.
महानगरपालिकेत उपलब्ध असलेल्या सरकारी कागदपत्रांच्या आधारे आजही ही जागा अग्निशामक दल, भाजी मार्केट आणि व्यावसायिक गाळ्यांसाठी राखीव आहे. दोन एकराच्या या जागेत सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा प्लॉट22 हजार 243 स्क्वेअर फुटाचा आहे. त्यावर त्यांनी 9425 स्क्वेअर फूट बांधकामाची अधिकृत परवानगी घेतली आहे. पण प्रत्यक्षात तीन पट जास्त बांधकाम झाल्याचा अंदाज आहे.

बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement