एक्स्प्लोर
Jejuri Khandoba : जेजुरीगडावर चंपाषष्ठीचा उत्सव; खंडेरायावर हळदीची उधळण, गडावर लोटला भाविकांचा जनसागर
Jejuri Champa Shashti Utsav : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाला सोमवारी सुरुवात झाली. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
Jejuri Khandoba Champa Shashti Utsav
1/10

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्टी उत्सव जेजुरी गडावर अतिशय जल्लोषात सुरू आहे. काल सोमवारी जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.
2/10

सायंकाळच्या सुमारास जेजुरी गडावर खंडोबा आणि म्हाळसा देवीला तेलवन करून हळद लावण्यात आली.
3/10

चंपाषष्टी उत्सवानिमित्ताने जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
4/10

लाखो भाविक या चंपाषष्ठीच्या काळात गडावर येत असतात.
5/10

जेजुरी गड हा विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला आहे.
6/10

जेजुरी गडाची ड्रोनची दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी...
7/10

चंपाषष्ठीनिमित्त स्थानिक नागरिकांसह राज्यभरातील भाविक जेजुरीला येऊन कुलधर्म कुलाचाराचा विधी करतात.
8/10

या काळात श्री खंडेरायाला भरीत रोडग्याचा विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो.
9/10

चंपाषष्ठीनिमित्त अनेक नागरिक जेजुरीला सहकुटुंब दर्शनाला येतात.
10/10

पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई, कोकण, नगरसह राज्यभरातील भाविक गडावर दाखल झाले आहेत.
Published at : 03 Dec 2024 08:51 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























